AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या दोन आठवड्यात… रुपाली ठोंबरेंनी दिली राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मोठी अपडेट; राज्यात मोठी उलथापालथ?

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रुपाली ठोंबरेंनी मोठी अपडेट दिली आहे. येत्या दोन आठवड्यात चित्र स्पष्ट होईल, असे म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. अजितदादांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल, असे संकेतही त्यांनी दिले. शरद पवार आणि सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील, तो मान्य असेल असे ठोंबरे म्हणाल्या.

या दोन आठवड्यात... रुपाली ठोंबरेंनी दिली राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मोठी अपडेट; राज्यात मोठी उलथापालथ?
sharad pawar sunetra pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 11, 2026 | 4:03 PM
Share

गेल्या आठवड्याभरापासून राज्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाचा विषय काढल्यानंतर या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच अजितदादा गटाच्या नेत्यांनी शरद पवारांच्या भेटीगाठी सुरू केल्याने दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आता अजितदादा गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी एक सूचक विधान केलं आहे. येत्या दोन आठवड्यात चित्र स्पष्ट होईल, असं म्हणत रुपाली ठोंबरे पाटील यांनी या चर्चेला हवाच दिली आहे.

रुपाली ठोंबरे यांनी मीडियाशी संवाद साधताना हे सूचक विधान केलं आहे. अजितदादा असताना देखील विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. सात महिन्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. शरद पवार आणि सुनेत्रा पवार विलिनीकरणाबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. अजितदादांच्या मनातील ही इच्छा होती, ती घडताना दिसणार आहे. या दोन आठवड्यात आपल्याला चित्र स्पष्ट झालेलं दिसेल, असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

तेव्हा चर्चा का फेटाळल्या?

यावेळी त्यांनी सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाच्या चर्चा तेव्हा का फेटाळल्या? नऊ महिन्यानंतर परत ही चर्चा काढली असेल तर कार्यकर्त्यांनी काढलेली दुःख आणि परिस्थिती परत येणार आहे का? असा सवाल करतानाच पक्षातील नेत्यांनी पदासाठी मौन व्रत घेतलं असेल तर मी त्याबद्दल बोलू शकत नाही. या सर्वांना सुनील तटकरे जबाबदार आहेत आणि त्यांनी त्याचे उत्तर द्यावे, असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या.

रामदास कदम यांचे आभार

माझा सुनील तटकरे यांच्या बांधाला बांध नाही. सुनील तटकरे यांना अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष बनवलं आहे. त्यावेळेपासून मी त्यांचं कामकाज बघत आहे. आमदार महेश थोरवे आणि रामदास कदम जे बोलले ते आमच्यासाठी धक्कादायक होतं. अजित पवार यांच्या अपघाताचे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये आहेत. रामदास कदम हे दुसऱ्या पक्षातील असून देखील त्यावर बोलले त्यासाठी मी त्यांची आभारी आहे, असं सांगतानाच अजितदादांच्या अपघाताचा तपास झालाच पाहिजे आणि त्याचा अहवाल आमच्यासमोर आलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

राजकारणात सांगता येत नाही

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीत तिसरा गट निर्माण होऊ शकतो, असा दावा केला होता. त्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. सध्या तिसरा गट होईल की नाही याची मला कल्पना नाही. मात्र राजकारणात काहीही होऊ शकतं, असं सूचक विधानही त्यांनी केलंय.

आसुरी आनंद तात्पुरता

गोकुळच्या निवडणुकीवर बोलताना मी वकील म्हणून भूमिका मांडेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. आता चेअरमनपदाचा तुम्ही तात्पुरता आसुरी आनंद घेत आहात. तो तात्पुरता आहे. प्रशासनाचे लोक पाठवले आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार देता येत नाही. कारण ते सत्ताधाऱ्यांचे नोकर असतात. कायदेशीर प्रक्रियेतला विलंब आहे. त्याचा फायदा फक्त चेअरमन पद निवडून आणण्यासाठी झाला आहे. तो तात्पुरता आहे. पुढे कोर्टामध्ये या गोष्टी टिकणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.

दादा असं करायला नको होतं

जनतेच्या मनातला कौल स्वीकारणे गरजेचे आहे. राजकारणाचा चिखल झाला आहे. चंद्रकांतदादांनी केलेलं वक्तव्य मला पटलेलं नाही. सत्तेत राहून धमक्या देत असाल तर हे चुकीचं आहे. दादा तुम्ही असं करायला नको होतं, असंही त्या म्हणाल्या.

Follow Us
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान