AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhaubeej Gift Idea : भाऊबीजेला भावाला द्यायचे आहे खास गिफ्ट? पाहा उपयोगी आणि भन्नाट आयडिया

Gift For Brother: भाऊबीज हा भाऊ-बहीण यांच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण आहे. यंदा भाऊबीजेला भावाला खास गिफ्ट द्यायचे असेल, तर हे भन्नाट आणि उपयोगी आयडिया नक्की पाहा.

Bhaubeej Gift Idea : भाऊबीजेला भावाला द्यायचे आहे खास गिफ्ट? पाहा उपयोगी आणि भन्नाट आयडिया
Bhaubeej
| Edited By: | Updated on: Nov 11, 2026 | 1:58 PM
Share

भाऊबीज हा भाऊ-बहीण यांच्यातील प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचे नाते अधिक घट्ट करणारा सण आहे. या दिवशी बहीण भावाला औक्षण करून त्याच्या सुखी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊही बहिणीला खास गिफ्ट देऊन तिचा आनंद द्विगुणित करतो. या दिवशी बहिण भावाला रुमाल, नॅपकीन, नारळ देण्याची परंपरा आहे. मात्र, काळानुसार यात बदल झाला असून, आता बहिण सुद्धा भावाला वेगवेगळे गिफ्ट देते. तुम्ही अजूनही भावासाठी गिफ्ट घेतले नसेल आणि काय घ्यावे हा प्रश्न पडला असेल तर हे पर्याय पाहा. हे गिफ्ट भावाच्या उपयोगी पडतील.

भावाला स्टायलिश वस्तू वापरण्याची आवड असेल, तर त्याच्यासाठी सुंदर घड्याळ निवडू शकता. त्याच्या आवडीनुसार क्लासिक अॅनालॉग वॉच किंवा स्मार्टवॉच हा चांगला पर्याय ठरू शकतो. रोजच्या वापरात येणारी ही वस्तू त्याला नक्की आवडेल.

आवडत्या सुगंधाचे परफ्यूम

परफ्यूम हा कोणत्याही प्रसंगासाठी चांगला गिफ्ट पर्याय आहे. भावाला आवडणारा फ्रेश, वुडी किंवा सौम्य सुगंध असलेला परफ्यूम निवडू शकता. गिफ्ट पॅकमधील परफ्यूम सेटही छान दिसतो.

स्टायलिश कपडे

भावाला फॅशनची आवड असेल, तर त्याच्यासाठी शर्ट, टी-शर्ट, हुडी किंवा जॅकेट खरेदी करू शकता. कपडे निवडताना त्याची आवड, साइज आणि रंगांची पसंती लक्षात घ्या.

वायरलेस ईअरबड्स किंवा हेडफोन

भावाला गाणी ऐकण्याची, गेम खेळण्याची किंवा ऑनलाइन काम करण्याची आवड असेल, तर वायरलेस ईअरबड्स किंवा हेडफोन गिफ्ट करू शकता. खरेदी करताना बॅटरी बॅकअप, साउंड क्वालिटी आणि वापरण्यास आरामदायक आहेत का, हे तपासा.

फिटनेस बँड किंवा जिम अॅक्सेसरीज

भावाला व्यायाम आणि फिटनेसची आवड असेल, तर त्याच्यासाठी फिटनेस बँड किंवा जिममध्ये उपयोगी पडणाऱ्या वस्तू निवडू शकता. यामुळे त्याच्या आवडीला प्रोत्साहनही मिळेल.

स्टायलिश वॉलेट

रोजच्या वापरासाठी उपयोगी पडणारं वॉलेट हादेखील चांगला पर्याय आहे. भावासाठी त्याच्या आवडीनुसार आकर्षक डिझाइन आणि चांगल्या दर्जाचं वॉलेट निवडू शकता. कमी बजेटमध्येही असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

पर्सनलाइज्ड गिफ्ट

भावाला काहीतरी वेगळे द्यायचे असेल, तर त्याच्यासाठी पर्सनलाइज्ड गिफ्ट निवडा. त्याच्या नावाची किंवा फोटोची खास आठवण जपणारी वस्तू देऊ शकता. यात तुम्ही त्याला रोज वापरता येईल असे मग, किचेन् असे पर्याय निवडू शकता. अशा गिफ्टमुळे भाऊबीजेचा आनंद आणखी खास होईल.

Follow Us
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान
काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
Gokul Milk Union : काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले..
Sanjay Raut vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले...
माझ्या गावाचा रस्ता... चिमुकल्याने थेट खासदारांनाच घेरलं; ओमराजेंचा...
माझ्या गावाचा रस्ता... चिमुकल्याने थेट खासदारांनाच घेरलं; ओमराजेंचा भन्नाट संवाद व्हायरल!
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा