AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाऊबीजेच्या दिवशीच सराफा बाजारात मोठा उलटफेर, सोन्याचे भाव धडाम, बहिणींसाठी लगेच गाठा दुकान

भाऊबीजेच्या शुभमुहूर्तावर सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तब्बल 1300 रुपयांनी सोने स्वस्त झाल्याने बहिणींना भेट देण्यासाठी किंवा खरेदीसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. गेल्या काही दिवसांपासूनच्या चढ-उतारानंतर आज सोन्याचे भाव लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत, तर चांदीच्या दरात मात्र वाढ दिसून आली आहे. दिवाळीतील ग्राहकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

भाऊबीजेच्या दिवशीच सराफा बाजारात मोठा उलटफेर, सोन्याचे भाव धडाम, बहिणींसाठी लगेच गाठा दुकान
jewellery Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 11, 2026 | 1:56 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावात चढउतार सुरू आहे. अमेरिकेतील निवडणुकीनंतर आधी सोन्याचे भाव वाढले. त्यानंतर लगेच खाली आले होते. त्यानंतर पुन्हा सोन्याचे भाव वाढले होते. मात्र, आज सराफा बाजारात मोठा उलटफेर झाला आहे. भाऊबीजेच्या दिवशीच सोनं तब्बल 1300 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीचे भाव स्थिर आहेत. त्यामुळे बहिणींसाठी सोनं खरेदी करण्याची ही नामी संधी आयतीच चालून आली आहे.

ऐन दिवाळीत ग्राहकांसाठी मोठी खूश खबर आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. सोन्याच्या दरात 1 हजार 300 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचे दर जैसे थे आहेत. आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 45 हजार 745 रुपये इतका आहे. तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 95 हजार 700 रुपये इतका झाला आहे. आज भाऊबीज असल्याने भावाकडून बहिणीला सोनं गिफ्ट देण्याची चांगली संधी चालून आली आहे.

किरकोळ बाजारातील भाव

किरकोळ बाजाराच्या आज विविध कॅरेटच्या सोन्याच्या किमतींमध्ये किंचित घसरण झालेली आहे. आज देशात 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 14,198 रुपये प्रति ग्रॅम आणि 1,13,584 रुपये प्रति 8 ग्रॅम आहे. कालच्या तुलनेत त्याच्या किमतीत अनुक्रमे 71 रुपये आणि 568 रुपयांची घसरण झाली आहे.

दागिने बनवण्यासाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 13,015 रुपये प्रति 1 ग्रॅम आणि 1,04,120 रुपये प्रति 8 ग्रॅम आहे. तो कालच्या तुलनेत अनुक्रमे 65 रुपये आणि 520 रुपयांनी स्वस्त झाला आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत आज 10,649 रुपये प्रति 1 ग्रॅम आणि 85,192 रुपये प्रति 8 ग्रॅमवर आली आहे. यात कालच्या तुलनेत अनुक्रमे 53 रुपये आणि 424 रुपयांची घट दिसून आली आहे. या किमतींमध्ये जीएसटी (GST) आणि मेकिंग चार्ज समाविष्ट नाहीत. स्थानिक कर आणि ज्वेलर्सनुसार अंतिम किमतींमध्ये थोडा फरक होऊ शकतो.

चांदीचा भाव काय?

आज चांदीची किंमत 3,570 रुपयांनी वाढून 1,86,660 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. तर काल तिचे क्लोजिंग सुमारे 1,83,090 रुपये प्रति किलोग्रॅमवर झाले होते. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही चांदी 3,317 रुपयांच्या वाढीसह 1,85,893 रुपये प्रति किलोग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. किरकोळ बाजारात आज चांदीची किंमत सुमारे 2,00,000 रुपये प्रति किलोग्रॅमच्या पातळीवर कायम आहे.

Follow Us
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान
काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
Gokul Milk Union : काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले..
Sanjay Raut vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले...
माझ्या गावाचा रस्ता... चिमुकल्याने थेट खासदारांनाच घेरलं; ओमराजेंचा...
माझ्या गावाचा रस्ता... चिमुकल्याने थेट खासदारांनाच घेरलं; ओमराजेंचा भन्नाट संवाद व्हायरल!
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा