Pratiksha Tondwalkar : वयाच्या 20 व्या वर्षी विधवा, SBI मध्ये झाडूवाली म्हणून काम नंतर थेट डॉक्टर बनण्यापर्यंत झेप, कोण आहेत प्रतीक्षा तोंडवळकर?
लग्न झाल्यामुळे शिक्षण अर्ध्यातच सुटलं. वयाच्या 20 वर्षी हातात 1 वर्षाचा बाळ खेळत असताना पतीचा अपघाती मृत्यू झाला. अनेक घरची काम, काबाडकष्ट, बँकेत झाडू मारण्यापासून केलेली मेहनत आणि आता त्याच बँकेत सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM ) पर्यंतचा प्रवास. जाणून घ्या प्रतीक्षा तोंडवाळकर यांच्याविषयी

आयुष्यात संकटं आली की अनेकदा माणूस खचून जातो. पण काही जण असे असतात, जे संकटांना आपली ताकद बनवतात. महाराष्ट्रातील प्रतीक्षा तोंडवलकर हे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी पतीचं निधनं झालं, सोबत एक वर्षांचं लहान मुलं होतं आणि हातात कोणताही भक्कम आर्थिक आधार नव्हता. अशा परिस्थितीत त्यांनी कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी SBI मध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम पाहिलं. मात्र याच नोकरीपासून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. पुढे त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच बँकेत सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणजेच असिस्टंट जनरल मॅनेजर ( AGM ) पदापर्यंत मजल मारली.
1964 मध्ये पुण्यात जन्मलेल्या प्रतीक्षाचे बालपण आर्थिक अडचणींनी भरलेले होते. वयाच्या 16-17 व्या वर्षी लग्न झाल्यामुळे प्रतीक्षा यांना सातवी इयत्तेनंतर आपले शिक्षण थांबवावे लागले. सदाशिव कडू यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मात्र लग्नाच्या अवघ्या तीन वर्षानंतर एक रस्ते अपघातात त्यांच्या पतीचं निधनं झालं. त्यावेळी प्रतीक्षा केवळ 20 वर्षांच्या होत्या आणि त्यांचा मुलगा 1 वर्षाचा.
शिलाई आणि भरतकाम यांसारखी छोटी-मोठी कामे
पतीच्या निधनानंतर मुलाचा सांभाळ करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. प्रतीक्षा यांनी स्वतःचा आणि आपल्या मुलाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शिलाई आणि भरतकाम यांसारखी छोटी-मोठी कामे केली. नंतर, आपल्या दिवंगत पतीचा थकीत पगार घेण्यासाठी त्यांनी मुंबईतील एसबीआयची शाखा गाठली.भेटीदरम्यान, त्यांनी शाखा व्यवस्थापकाकडे नोकरी शोधण्यासाठी मदत मागितली आणि आपल्या मुलाचे संगोपन करण्यासाठी उत्पन्नाच्या साधनाची गरज असल्याचे सांगितले.
SBI बँकेत झाडूमारण्याचं काम
पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर, बँकेने त्यांना अर्धवेळ झाडूवालीच्या नोकरीची ऑफर दिली. 1985 मध्ये, तिने एसबीआयमध्ये काम करण्यास सुरुवात केली, जिथे त्यांना दरमहा सुमारे 60- 65 रुपये पगार मिळत होता . शाखा उघडण्यापूर्वी बँकेचा परिसर झाडणे आणि पुसणे, शौचालये स्वच्छ करणे आणि फर्निचरवरील धूळ झटकणे या जबाबदाऱ्या तिच्यावर होत्या.
मानसशास्त्रात पदवी मिळवली
मात्र नोकरी मिळाल्यानंतरही त्यांनी शिक्षणाचं स्वप्न सोडलं नाही. भंगार विक्रेत्याकडून पुस्तक विकत घेऊन त्यांनी त्यांच उर्वरित शिक्षण पूर्ण केलं. 60% मिळवत त्यांनी दहावीची परीक्षा पार पाडली. त्यानंतर मुंबईतील विक्रोळी येथील नाईट कॉलेजमधून बारावीचं शिक्षणं पूर्ण केलं. पुढे मानसशास्त्रात पदवी मिळवली.
1990 मध्ये कॅशियर बनल्या
1990 मध्ये प्रतीक्षा यांना झाडूवाली पदावरून संदेशवाहक पदावर बढती मिळाली. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर, तिने 1995 मध्ये अंतर्गत विभागीय परीक्षा उत्तीर्ण केली आणि ती लिपिक कॅशियर बनल्या. 1993 साली तिने प्रमोद तोंडवाळकर यांच्याशी दुसरा विवाह केला. त्यांनी तिला अंतर्गत बँकिंग परीक्षा देण्यास आणि एसबीआयमध्ये उच्च पदांवर जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. सतत तयारी आणि कठोर परिश्रमाने, तिने आवश्यक परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी पदापर्यंत मजल मारली.
जून 2022 मध्ये SBI मध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM )
गेल्या काही वर्षांत, तिने अनेक वरिष्ठ जबाबदाऱ्या स्वीकारल्या. जून 2022 मध्ये, एसबीआयमध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM ) आणि नंतर उप हाव्यवस्थापक (डीजीएम) बनून तिने एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या सगळ्यानंतर त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले ते म्हणजे डॉक्टर होण्याचे बँकेतून निवृत्त झाल्यावर प्रतीक्षा यांनी डॉक्टर बनण्याचे आपले दीर्घकाळापासूनचे स्वप्न पूर्ण केले. वयाच्या सुमारे 55व्या वर्षी, तिने निसर्गोपचारातील दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्या डॉक्टर झाल्या.
