Hardik Pandya vs Shreyas Iyer: श्रेयस की हार्दिक पंजाब किंग्जचा कर्णधार कोण? हार्दिकने एक पोस्ट शेअर करत सगळ सांगून टाकलं
Hardik Pandya Share Post: पंजाब किंग्जचा कर्णधार कोण असणार हार्दिक पंड्या की श्रेयस अय्यर असा प्रश्न चाहत्यांना पडला असणार, आता हार्दिकने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

IPL Trade: आयपीएल २०२७ च्या आधी, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात एक मोठा करार झाला आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या पंजाब संघात सामील होईल, तर अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्समध्ये सामील होईल. बीसीसीआयने या कराराची अधिकृत घोषणा केली आहे. हार्दिक पांड्या आणि अर्शदीप यांच्या कराराची बातमी गेल्या काही दिवसांपासून समोर येत होती, परंतु त्याची अधिकृत घोषणा झाली नव्हती.
बीसीसीआयने हार्दिक आणि अर्शदीप यांच्यातील कराराला अंतिम स्वरूप दिले. मुंबईने हार्दिकला १६.३५ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते, परंतु आता तो १८ कोटी रुपयांना पंजाब संघात सामील होईल. दरम्यान, अर्शदीप सिंगला पंजाबने लिलावात १८ कोटी रुपयांना विकत घेतले होते आणि तो त्याच रकमेत मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे.
View this post on Instagram
आता हार्दिक पंजाबमध्ये सामील होताच तो कर्णधार बनणार का अशी चर्चा रंगली होती. या सगळ्या चर्चांवर हार्दिकने एक पोस्ट शेअर करत मौन सोडले आहे. हार्दिकने पंजाबच्या जर्सीमधील त्याचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “सत श्री अकाल, श्रेयस अय्यर माझा कॅप्टन, रिकी पोटिंग माझा कोच, पंजाबचा माझा संघ, मी तुमच्या पाठीशी आहे.” यावरुन हार्दिक फक्त खेळाडू म्हणून खेळणार आहे हे समजत आहे.
हार्दिक पांड्या २०१५ मध्ये पहिल्यांदा मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला होता. या काळात त्याने एक खेळाडू म्हणून चार विजेतेपदे जिंकली. त्यानंतर तो २०२२ पूर्वी गुजरात टायटन्समध्ये दाखल झाला, जिथे त्याने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच हंगामात विजेतेपद पटकावले. आयपीएल २०२४ पूर्वी, तो कर्णधार म्हणून मुंबईत परतला, पण त्याला प्रभाव पाडण्यात अपयश आले. पांड्याच्या कर्णधारपदाखाली मुंबईने तीन हंगाम खेळले आणि केवळ एकदाच पात्रता फेरी गाठली.
पंजाबचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे आहे, जो टीम इंडियाचाही कर्णधार आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली संघाने २०२५ चा अंतिम सामना खेळला होता. परिणामी, तो पीबीकेएसचे कर्णधारपद कायम ठेवेल. माध्यमांच्या वृत्तांवर विश्वास ठेवल्यास, पांड्या अय्यरच्या कर्णधारपदाखाली खेळण्यास तयार आहे.
