AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आत्मचरित्रानंतर भाजपचे सोनिया गांधींना तीन सवाल, बाबरी ढाचा, राम मंदिर ते बाटला हाऊस; सगळंच काढलं

Sonia gandhi autobiography : सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रावरुन सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. या पुस्तकावरुन आता गांधींवर भाजपच्या आमदारांनी या पुस्तकावर सडकून टीका केली आहे.

आत्मचरित्रानंतर भाजपचे सोनिया गांधींना तीन सवाल, बाबरी ढाचा, राम मंदिर ते बाटला हाऊस; सगळंच काढलं
Sonia Gandhi BookImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 11, 2026 | 4:45 PM
Share

सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रावरून भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. बाटला हाऊस चकमकीचा दाखला देत त्यांनी सोनिया गांधींवर गंभीर आरोप केले. राम मंदिर आणि बाबरी ढाच्याबाबतही त्यांनी विधान केलं आहे. ते अमरावतीत बोलत होते. बाटला हाऊस चकमकीत अतिरेकी मारले गेले तेव्हा सोनिया गांधींच्या डोळ्यात अश्रू आले. पण पोलीस अधिकारी मारले गेले तेव्हा कळवळा आला नाही असं खासदार अनिल बोंडे म्हणाले आहेत.

देशविरोधी आणि आक्रमकांच्या बाजूने राहायचा हाच काँग्रेसचा अजेंडा असल्याचं म्हणत भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावरून टीकास्र डागलं आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रावरून भाजपचे आक्रमक खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी काँग्रेसवर आणि सोनिया गांधींवर तोफ डागली. राम लल्ला इतके दिवस झोपडीत राहिले तेव्हा त्यांच्या मनात काही आले नाही, मात्र गुलामीचे प्रतीक असलेला बाबरीचा ढाचा जेव्हा कारसेवकांनी पाडला, तेव्हा त्यांना अभिमान वाटायला हवा होता, असा सवाल डॉ. बोंडे यांनी उपस्थित केला आहे.

बाटला हाऊसमध्ये अतिरेकी मारले गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात, परंतु कर्तव्य बजावताना पोलीस निरीक्षक शर्मा यांना वीरमरण आले तेव्हा त्यांच्या मनात कळवळा आला नाही, असा घणाघात बोंडे यांनी केला आहे. केवळ मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यासाठी आणि मतांचे राजकारण करण्यासाठीच हे सर्व घडत असून, परक्यांच्या आक्रमणाबाबत आणि देशविरोधी शक्तींच्या बाजूने उभे राहण्याचा हा काँग्रेसचा जुनाच अजेंडा असल्याची टीका खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे, असं डॉ.अनिल बोंडे म्हणाले आहेत.

दरम्यान, सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे. यामध्ये त्यांचे खाजगी आयुष्य आणि आणि त्यांचा जीवन प्रवास उलगडण्यात आला आहे. हे पुस्तक प्रामुख्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर, इटलीमधील सामान्य कुटुंबातून येऊन भारतातील सर्वात प्रभावी राजकीय कुटुंबाचा (नेहरू-गांधी कुटुंब) भाग बनण्याच्या प्रवासावर आधारित आहे. त्यांनी याला पूर्णपणे राजकीय पुस्तक न म्हणता खाजगी आयुष्याची कहाणी म्हटलं आहे.

Follow Us
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान