Maharashtra News LIVE : रत्नागिरीत पहाटे भीषण अग्नितांडव, ‘महालक्ष्मी मिनी मॉल’ जळून खाक
Maharashtra news LIVE : रत्नागिरीत पहाटे भीषण अग्नितांडव... के. सी. जैन नगरातील 'महालक्ष्मी मिनी मॉल' जळून खाक झाल्याची माहिती समोर येत असून, कल्याण-डोंबिवलीत बांधकाम साईटवर पाण्याची खुलेआम उधळपट्टी सुरु आहे. नवीन इमारतींच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरु आहे. यासहित जगासहित देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES
-
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांची भाऊबीज…
अमरावती-दिवाळीच्या आनंदोत्सवात उत्साहानंतर भाऊ-बहिणीच्या जिव्हाळ्याचे प्रतीक असलेली भाऊबीज उत्साहात साजरी केली जाते. अमरावतीमध्ये काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी यशोमती ठाकूर आणि काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांच्यात भाऊबीज उत्साहात पार पडली.. यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखडे यांना औक्षवंत करत ओवळणी घातली… त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी बळवंत वानखडे यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले… बळवंत वानखडे यांनी यशोमती ठाकूर यांना साडी गिफ्ट दिली,
यावेळी यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली.आज माझा भाऊ खासदार आहे उद्या अजून त्यापेक्षाही मोठे झाले पाहिजे अशी प्रार्थना करतो..बळवंत दादा आवर्जून दरवर्षी घरी येतात..एक भावनिक नातं आमच्यामध्ये आहे..माझा भाऊ सुखरूप राहिला पाहिजे अशी देवाचरणी प्रार्थना असं त्यांनी म्हटलं.. तर आमचं भाऊ बहिणीचं नातं आहे अशी प्रतिक्रिया बळवंत वानखडे यांनी दिली…
-
नागपूर विधीमंडळ अधिवेशनासाठी नाशिक मनपाची दहा वाहने अधिग्रहित
नागपूर विभागीय आयुक्तांनी नाशिक मनपाला पत्र पाठवून ४ कार व ६ जीप अशी १० वाहने अधिग्रहित करण्याचे आदेश दिले. अधिग्रहित वाहनांवर शासकीय चालक नसेल तर पर्यायी चालकाची व्यवस्था करावी. वाहने वेळेत नागपूर कार्यालयाकडे सुपूर्द करावीत. अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यावर शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचा इशारा दिला आहे. व्हीआयपींसाठी वाहनाची गरज भासत असल्याने राज्य शासनाकडे असलेल्या विशेष अधिकाऱ्यांचा वापर करून नाशिक मनपाकडून वाहने मागितली.
-
-
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार. अधिवेशनासाठी २५ नोव्हेंबरपासून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नागपुरात आगमन होणार. २७ नोव्हेंबरपर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उद्दिष्ट आहे . तयारीसाठी एकूण ३८६ कामे निश्चित; २२९ कार्यालयीन इमारतींमध्ये, तर १५७ निवासस्थानांमध्ये, मात्र, सुमारे १५० निविदा अद्याप खुल्या झालेल्या नाहीत.अनेक कामांचे कार्यादेशही जारी नसल्याने तयारीवर प्रश्नचिन्ह तयार होत आहेत. काही निविदांना कंत्राटदारांचा प्रतिसाद नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. सर्व महत्त्वाची कामे सुरू असून २७ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होतील, असा पीडब्ल्यूडीचा दावा आहे.
-
कल्याण पूर्वेत दुचाकी चोरट्यांची दहशत! एकाच परिसरातून दोन दुचाकी लंपास!
कल्याण पूर्वेतील दुर्गा मंदिर शक्तिधाम परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. रॉयल गार्डन सोसायटीच्या पार्किंगमध्ये अशोक तिवारी चावी गाडीला विसरले; चोरट्याने संधी साधत ॲक्टिव्हा पळवली. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्याची चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. दुसरी मोटारसायकल डुप्लिकेट चावीने लंपास केल्या आहेत.
-
दिवाळी पाडव्याच्या मंगल पर्वावर नागपुरातील स्वामीनारायण मंदिरात अन्नकुट महोत्सव पार पडला
दिवाळी पाडव्याच्या मंगल पर्वावर नागपुरातील स्वामीनारायण मंदिरात अन्नकुट महोत्सव पार पडला आहे. यावेळी शेकडो खाद्यपदार्थ, मिठाईचे नानाविध प्रकार आणि पंचपकवानांची सुबक सजावट करण्यात आली होती. अन्न हे केवळ उदरभर्णाचे साधन नसून ईश्वराचा प्रसाद आहे या श्रद्धेचा प्रत्यय देणारा हा सोहळा ठरला. यावेळी मंदिराचे सभागृह फुलांच्या आरसीने सजविण्यात आले होते. या अन्नकुट महोत्सवाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती.
-
-
हिंगोली- तीन एक शेतातील हळदीच्या पिकांवर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर फिरवला
हिंगोली- तीन एक शेतातील हळदीच्या पिकांवर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर फिरवला आहे. कळमनुरी तालुक्यातील शिवम मुधोळ ह्या शेतकऱ्यांची पाण्या अभावी हळद वाळल्याने तीन एकर मधील हळदीवर ट्रॅक्टर फिरवला. तीन ते साडे तीन लाख रुपये हळदीवर केलेला खर्च शेतकरी मुधोळ यांचा पाण्यात गेलाय.
रत्नागिरी शहरातील के. सी. जैन नगर येथील ‘श्री महालक्ष्मी मिनी मॉल’ला बुधवारी पहाटे भीषण आग लागली असून, यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेटची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पण पाण्याच्या तुटवड्यामुळे आग विझवण्यात अडथळे आले. तर दुसरीकडे, पुण्यात रात्री कोथरूड डीपी रोडवरील महात्मा सोसायटी चौकमधील पंजाब कॅन्टीन समोर हुंडाई i20 गाडीला आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आलं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एवढंच नाही तर, महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट असताना कल्याण-डोंबिवलीत बांधकाम साईटवर पाण्याची खुलेआम उधळपट्टी सुरु आहे. नवीन इमारतींच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरु आहे. रस्ते धुण्यापासून धूळ नियंत्रण आणि विकासकांच्या गाड्या धुण्यापर्यंत पाण्याची नासाडी होत आहे, संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी KDMC प्रशासनाने नियोजन करून पाण्याचा अपव्यय करणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यासहित जगासहित देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
Published On - Nov 11,2026 8:24 AM
