AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhaubeej 2026 Wishes: लाडक्या भाऊ बहिणीला पाठवा भाऊबीजेच्या शुभेच्छा! सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी पाहा मेसेज!

Bhaubij Wishes 2026 in Marathi: आज भावा-बहिणीच्या सुंदर नात्याला साजरं केलं जातं. या भाऊबीजेच्या खास दिनी आपल्या भावा-बहिणीला आणि प्रियजनांना खास मेसेज पाठवा.

Bhaubeej 2026 Wishes: लाडक्या भाऊ बहिणीला पाठवा भाऊबीजेच्या शुभेच्छा! सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी पाहा मेसेज!
Bhaubeej 2026 Wishes
| Updated on: Nov 11, 2026 | 8:21 AM
Share

Bhaubij Wishes 2026 in Marathi: आज ११ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीतील भावा-बहीणाच्या नात्याला साजरा करणारा सण मध्येच भाऊबीज साजरा केला जात आहे. हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र प्रेमाचे व नात्यातील जिव्हाळ्याचे प्रतीक आहे. हा सण दिवाळीच्या उत्सवाचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस असून तो भाऊ-बहिणीच्या अतूट आणि पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे.

या दिवशी बहिणी आपल्या भावाचं औक्षण करते, कपाळावर टिळा लावून त्याच्या उदंड, निरोगी आणि यशस्वी आयुष्यासाठी प्रार्थना करते. ओवाळणी नंतर भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी म्हणून सुंदर भेटवस्तू देतो. एवढंच नाही तर आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. या सुंदर सणाच्या तुमच्या लांबच्या भावाला किंवा बहिणीला जर शुभेच्छा पाठवायच्या असतील तर आवर्जून तुम्ही हे शुभेच्छा मेसेज पाहा.

> सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा! भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

> तुझा चेहरा नेहमी हसरा असावा,भाऊबीजेच्या दिवशी तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव व्हावा! माझ्या प्रत्येक संकटात खंबीरपणे उभा राहणाऱ्या माझ्या लाडक्या भावाला भाऊबीजेच्या शुभेच्छा!

> आली आज भाऊबीज ओवाळते भाऊराया, राहू दे रे नात्यामध्ये स्नेह, आपुलकी माया! भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

> भांडण जरी रोज असलं, तरी जगात सर्वात जास्त माया तुझ्यावरच आहे. देवाकडे हीच प्रार्थना आहे की आपल्या प्रेमाचे हे बंध नेहमी असेच घट्ट राहोत. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा, दादा!

> माझ्या प्रत्येक सुखात आणि संकटात पाठीशी राहणाऱ्या माझ्या सुजाण आणि लाडक्या भावाला भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुझा आशीर्वाद आणि तुझी साथ नेहमी अशीच सोबत असू दे!

> तुझ्या आयुष्यात यशाची नवी शिखरं तुला पाहायला मिळोत आणि तुझं आयुष्य नेहमी आनंदाने भरून जावो. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या गोड भावाला!

> तुझ्या ओवाळण्याने आणि चेहऱ्यावरील हसूने घराला घरपण येतं. माझ्या लाडक्या, हट्टी पण तितक्याच समजूतदार बहिणीला भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा!

> तू जिथे असशील तिथे सुख, समृद्धी आणि आनंद राहो, हीच आजच्या पवित्र दिवशी देवाकडे प्रार्थना. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भेट असणाऱ्या माझ्या बहिणीला भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा!

> लहानपणीची ती भांडणं आणि आता एकमेकांसाठी वाटणारी ही काळजी… हेच तर आपल्या नात्याचं सौंदर्य आहे. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा, ताई!

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?