Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांना दिवाळीत आनंदवार्ता, कोर्टाने काय दिला दिलासा
CJP Abhijeet Dipke: सीजेपीचे संयोजक अभिजीत दिपके यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला. त्यांना ऐन दिवाळीत मोठी सवलत दिली. विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्यांनी एका कायदेशीर प्रकरणात दिलासा दिला.

CJP Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संयोजक अभिजीत दिपके यांना कोर्टात दिलासा मिळाला. लहरा दो तिरंगा प्रकरणातील कायदेशीर प्रकरणात त्यांना हा दिलासा देण्यात आला. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर प्रकरणात सुनावणी सुरू आहे. त्यांना व्यक्तिगतरित्या न्यायालयात हजर राहण्यापासून सवलत देण्यात आली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहू शकले नाहीत, त्याची दखल घेत न्यायालयाने हा निर्णय दिला.
विशेष न्यायदडांधिकाऱ्यांकडून सशर्त जमाी
गेल्या महिन्यात अभिजीत दिपके यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 10 ऑक्टोबर रोजी आंदोलनाची हाक दिली होती. हे आंदोलन करता न आल्याने त्यांनी नंतर लहरा दो तिरंगा आंदोलनाची घोषणा केली. कॅनॉट प्लेसकडे जाताना दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १६३ अंतर्गत निर्बंधांचे उल्लंघन केल्याने त्यांना १७ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले होते. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी काही अटींच्या आधीन राहून त्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता.
२ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी
दरम्यान याप्रकरणात प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहू शकले नाहीत. त्यांचे वकील अभिक चिमनी यांनी याविषयीची विनंती न्यायालयाकडे केली. त्यानंतर दंडाधिकाऱ्यांना त्यांना वैयक्तिकरित्या हजर राहण्यापासून सूट दिली. तर वकिलांनी पोलिसांनी बजावलेली नोटीस, पोलीस अहवाल आणि कागदपत्रांची पूर्तता केली. प्रकरणात २ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
भाजप सत्तेतून बाहेर फेकली जाणार
अभिजीत दिपके यांनी केरळ दौऱ्यावर असताना एक मोठे वक्तव्य केले. भाजप सत्तेतून बाहेर फेकली जाणार असा दावा त्यांनी केला. SIR प्रकरणात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात त्यांनी कोचीन इथं आंदोलन केल्यानंतर त्यांनी भाजपविरोधात मोठा हल्लाबोल केला. त्यांनी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेतून बाहेर फेकली जाईल असा दावा केला. सीजेपी नेता सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अटक करण्याच्या मुद्दावर बोलताना ते जिथेही जातील तिथे ते तिरंगा घेऊन जातील असे अभिजीत दिपके म्हणाले.
