प्रकाश महाजन यांची पहिल्यांदाच रश्मी ठाकरे यांच्यावर टीका; म्हणाले, नवऱ्याच्या मुख्यमंत्रपदात रस नव्हता…

आनंद पांडे

| Edited By: |

Updated on: Jan 08, 2023 | 7:17 AM

बाळासाहेबांनी आयुष्यभर शरद पवारांशी मैत्री केली, पण राजकीय सोयरीक केली नाही. बाळासाहेबांना पुढचं भविष्य माहीत होतं. त्याच पवारांनी नंतर एका दगडात दोन पक्षी मारले.

प्रकाश महाजन यांची पहिल्यांदाच रश्मी ठाकरे यांच्यावर टीका; म्हणाले, नवऱ्याच्या मुख्यमंत्रपदात रस नव्हता...
प्रकाश महाजन यांची पहिल्यांदाच रश्मी ठाकरे यांच्यावर टीका
Image Credit source: tv9 marathi

मुंबई: मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर नाव न घेता टाकी केली आहे. रश्मी ठाकरे यांना नवऱ्याच्या मुख्यमंत्रीपदात काहीच रस नव्हता. त्यांना आपल्या मुलाला मंत्री झालेलं पाहायचं होतं. त्यामुळेच हा आघाडीचा घाट घातला गेला, असा दावा करतानाच उद्धव ठाकरे आजारी होते की नाही यावर शंका येते. उद्धव ठाकरे यांना आजारी पाडून त्यांनीच स्वत: कारभार केल्याचा आरोप प्रकाश महाजन यांनी केला आहे. प्रकाश महाजन यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.

मुंबईत मनसेचं घे भरारी अभियान सुरू झालं आहे. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सभेला प्रकाश महाजन संबोधित करत होते. सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री करेल अशी शपथ उद्धव ठाकरेंनी घेतली. त्यामुळे एकनाथ शिंदे टापटीप राहयचे. त्यांना वाटायचं आपणच मुख्यमंत्री होऊ. पण शिवसेनेतील या जोडगोळीने एक काम केलं. अन् घरी सैरंद्रीने केस मोकळे सोडले. सैरंद्रीने केसं मोकळे सोडल्यावर काय होतं हे तुम्हाला माहीतच असेल, असा चिमटा प्रकाश महाजन यांनी काढला.

हे सुद्धा वाचा

सैरंद्रीला नवरा मुख्यमंत्री होतो की नाही यात काही रस नव्हता. त्यांना मुलाला मंत्री करायचं होतं. पण घरच्या तापापायी त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि कारभार सुरू केला. मुळातच औकात… म्हणजे क्षमता… औकात नसलेल्या माणसाला गादीला बसवलं. मला संशय आहे की आजारपण सुद्धा खरं की खोटं होतं. कारण कारभार यांना करायचा होता. त्यामुळे यांना आजारी पाडलं अन् कारभार सुरू केला, असा गौप्यस्फोट महाजन यांनी केला.

उद्धव ठाकरे बापाचं भांडवल आणि बापचं नाव घेऊन आले. त्यांना बाकीचा काही अनुभव नाही. एखादी शाखा चालवण्याचा अनुभव नाही. हे सरकार स्थापन झालं. या सरकारनं असं काय केलं? कोरोना आला मुख्यमंत्री घरात बसले.

आज काय अवस्था आहे? तुझ्या शिवसेना भवनावर लोक दावा सांगू लागले, बापाने दिलेलं भांडवल दहा वर्षात बसवणारा हा नतद्रष्ट पोरगा निघाला, असा हल्ला त्यांनी चढवला.

बाळासाहेबांनी आयुष्यभर शरद पवारांशी मैत्री केली, पण राजकीय सोयरीक केली नाही. बाळासाहेबांना पुढचं भविष्य माहीत होतं. त्याच पवारांनी नंतर एका दगडात दोन पक्षी मारले. उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं.

तुम्ही क्षणिक मुख्यमंत्रीपदासाठी पित्याने जपलेले राजकीय विचार सोडून दिले. केवळ मुख्यमंत्रीपदीपदासाठी विचार सोडले. त्याही पुढे शरद पवारांचा डाव होता अन् शिवसेनेचे दोन शकले झाले, असं ते म्हणाले.

खरा मर्द राज ठाकरे आहे. त्यांनी शिवसेनेची चिरेबंदी सोडून दिली. आपली भाकरी आपल्या हाताने तयार केली. ते म्हणतात ना पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. बाप भलं मोठं भांडवलं सोडून गेला होता. दहा वर्षात त्या पक्षाचं पूर्ण वाटोळं करून आता बसलेत, अशी टीकाही त्यांनी केली.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचा फायदा झाला. कारण राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहूच शकत नाही. वाटेल ते करून ते सत्तेत येतात. राष्ट्रवादीने महाराष्ट्रात दुसरा गेम सुरू केला. 2004साली त्यांनी एक खेळ खेळला होता. जाती जातीत भांडणं सुरू करायचे. आताही तेच सुरू केलं आहे. कारण राजकीय विचार त्यांच्याकडे नाहीये. आताही त्यांनी जाती जातीत भांडणं सुरू केली आहेत, असं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI