दुर्दैव ते किती? कोल्हापूरच्या ऑक्सिजन संशोधकाचा ऑक्सिजनअभावी चेन्नईत मृत्यू

ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या तरुण संशोधकाचा चेन्नईत चक्क ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. डॉ. भालचंद्र काकडे (Dr Bhalchandra Kakade) असं या दुर्दैवी डॉक्टरचं नाव आहे.

दुर्दैव ते किती? कोल्हापूरच्या ऑक्सिजन संशोधकाचा ऑक्सिजनअभावी चेन्नईत मृत्यू
Oxygen scientist Dr Bhalchandra Kakade

कोल्हापूर : ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या तरुण संशोधकाचा चेन्नईत चक्क ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. डॉ. भालचंद्र काकडे (Dr Bhalchandra Kakade) असं या दुर्दैवी डॉक्टरचं नाव आहे. कोल्हापूरच्या या 44 वर्षीय डॉ भालचंद्र काकडे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर चेन्नईत उपचार सुरु होते. मात्र त्यांना ऑक्सिजनच न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. (Corona positive Oxygen scientist Dr Bhalchandra Kakade from Kolhapur died due to lack of oxygen at Chennai)

डॉ. भालचंद्र काकडे हे चेन्नईतील एस आर एम युनिव्हर्सिटीत  कार्यरत होते. ऑक्सिजनचे सूक्ष्म गुणधर्म यावर काकडे यांचं संशोधन होतं. इंधन निर्मिती आणि प्लॅटिनम संशोधनातील सात पेटंट काकडे यांच्या नावावर आहेत. मात्र कोरोनावर उपचार सुरु असताना ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांच्यावर मृत्यू ओढवला.

शिवाजी विद्यापीठात पदवी

संशोधक असलेल्या डॉ. भालचंद्र काकडे यांनी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांनी रसायनशास्त्र विषयात डिग्री मिळवली होती. मग त्यांनी ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या एकत्रित वापराबाबत संशोधन सुरु केलं होतं. केवळ संशोधन सुरु करुन ते थांबले नाहीत. त्यांनी यामध्ये तब्बल 7 पेटंटही मिळवली होती. त्यांच्या कर्तृत्त्वाने भारावलेल्या अमेरिका, जपानने त्यांना फेलोशिप दिली होती.

पत्नीही संशोधनकार्यात

दरम्यान, भालचंद्र काकडे यांच्या पत्नीही संशोधनकार्यात व्यस्त असतात. डॉ. भालचंद्र काकडे कार्यरत असलेल्या चेन्नईतील एसआरएम रिसर्च इन्सिट्यूटमध्येच पत्नीही संशोधनकार्य करते.

लॅबमध्ये कोरोना

दरम्यान, डॉ. भालचंद्र काकडे हे जिथे संशोधन करत होते, त्या लॅबमध्ये कोरोनाने एण्ट्री केली होती. लॅबमधील अनेकांना संसर्ग झाल्याने डॉ. काकडे यांचीही चाचणी करण्यात आली. मग त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांनी आधी घरातच उपचार सुरु केले. मग त्यांना सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केल्याचं सांगण्यात येतंय. तिथे उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत होते. मात्र चार दिवसापूर्वी म्हणजे मंगळवारी रात्री संबंधित रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपला. त्यामुळे भालचंद्र काकडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऑक्सिजन संबंधित संशोधन करणाऱ्या डॉक्टरवर ऑक्सिजनअभावी मृत्यू ओढवतो यासारखं दुर्दैव नसावं.

रोहित पवार यांचं ट्विट

निःशब्द!
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणारे डॉ. भालचंद्र काकडे यांचं उपचार घेताना ऑक्सिजनअभावी चेन्नईत निधन झालं, ही प्रचंड वेदना देणारी घटना आहे. आपण एका जागतिक पातळीवरच्या संशोधकाला गमावलं!
माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!💐🙏

(Corona positive Oxygen scientist Dr Bhalchandra Kakade from Kolhapur died due to lack of oxygen at Chennai)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI