AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रपुरात काँग्रेस नेत्यावर जीवघेणा हल्ला! नगरसेवकाला मारहाण करण्याचे कारण काय?

काँग्रेस नेते नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर तीन हल्लेखोरांनी हल्ला केला. नागरकर हे मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना दुचाकीस्वारांनी भर चौकात त्यांना क्रिकेट बॅटने मारहाण केली. हल्ला नेमक्या कोणत्या कारणाने झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.

चंद्रपुरात काँग्रेस नेत्यावर जीवघेणा हल्ला! नगरसेवकाला मारहाण करण्याचे कारण काय?
रुग्णालयात उपचार घेताना चंद्रपूर येथील जखमी नगरसेवक नागरकर. Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 04, 2022 | 11:43 AM
Share

चंद्रपूर : चंद्रपुरात काँग्रेस नेत्यावर जीवघेणा हल्ला झालाय. पाळतीवर असलेल्या 3 युवकांनी काँग्रेस नेते नगरसेवक नंदू नागरकर (corporator Nandu Nagarkar) यांच्यावर हल्ला केला. नागरकर यांची दैनंदिनी माहीत असल्याने मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरकर यांना दुचाकीस्वारांनी भर चौकात क्रिकेट बॅटने मारहाण (Beaten with a cricket bat) केली. तोंडावर मास्क घातलेल्या या युवकांनी आधी मुद्दाम गाडी आडवी घातली. मग अकारण भांडण उकरून काढत मराठी सिटी शाळा चौकात मारहाण केली. हल्लेखोर घटनेनंतर फरार झाले. नागरकर काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष ( former city president of Congress)- माजी स्थायी सभापती आणि विद्यमान नगरसेवक आहेत. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणाने झाला याबाबत चर्चांना उत आलाय. या हल्ल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केलाय.

हल्लेखोरांनी तोंडावर घातला होता मास्क

नंदू नागरकर नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला गेले. त्यांच्यासमोर तीन हल्लेखोर दुचाकीने आले. त्यांनी नंदू यांचा रस्ता अडवला. मराठी सिटी शाळा चौकात ही घटना घडली. हल्लेखोरांनी मास्क घातले होते. त्यामुळं त्यांना ओळखता आले नाही. हे हल्लेखोर कोण आहेत, हे अद्याप समजले नाही.

मारहाण करणारे क्रिकेट खेळणारे असावे

ही मारहाण करताना या हल्लेखोरांनी क्रिकेटच्या बॅटचा वापर केला. याचा अर्थ हल्लेखोर हे क्रिकेट खेळणारे असावेत, असा अंदाज व्यक्त केला जातो. मारहाण केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नंदू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नागपूर महापालिकेवर प्रशासक, मुदत संपल्याने शनिवारपासून आयुक्त सांभाळणार धुरा, निवडणुकांबाबत अनिश्चितता

नागपुरात एसीबीची मोठी कारवाई, चार लाखांची लाच घेताना अधिकारी, सीए जाळ्यात! प्रकरण काय आहे?

अर्थमंत्री विरुद्ध ऊर्जामंत्री वादाचा 2 लाख 50 हजार उद्योजकांना फटका, या अधिवेशनात तरी तोडगा निघणार का?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली