परभणीत आभाळ कोसळलं, 233 मेंढ्या वाहून गेल्या, 24 तासात 232 MM पावसाची नोंद

हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर, पुणे, ठाणे, पालघर, मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर जालना, औरंगाबाद लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीला येलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

परभणीत आभाळ कोसळलं, 233 मेंढ्या वाहून गेल्या, 24 तासात 232 MM पावसाची नोंद
heavy rain lashes Parbhani
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 8:44 AM

मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावलीय. परभणी जिल्ह्यात तर आभाळच कोसळलय. ह्या पावसात शेतीचं, जनावरांचं, पीकाचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. त्यातल्या त्यात ओढ्या नाल्या, नद्यांना आलेल्या अचानक पुरामुळे जीवितहाणी मोठ्या प्रमाणात झाल्याचं समोर येतं आहे.

आणि 233 मेंढ्या दगावल्या परभणीत गाव आहे शिर्सी बुद्रुक. याच गावात 233 मेंढ्या दगावल्या आहेत. ह्या सर्व मेंढ्या 10 मेंढपाळांच्या आहेत. सर्वच्या सर्व मेंढ्या अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं मेंढपाळांनी सांगितलंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसामुळे मेंढ्या मरण्याची कदाचित ही पहिलीच घटना असेल. ह्या एका घटनेमुळे मेंढपाळांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. त्याची भरपाई केली जावी अशी मागणीही होतेय.

परभणीत रेकॉर्डब्रेक पाऊस परभणी हा तसा कोरडा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण इथं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीनही ऋतू तीव्र असतात. नाही पडला तर पाऊसच पडत नाही आणि एकदा पडायला लागला तर थांबत नाही असे प्रसंग इथं अनेक वेळेस घडतात. त्याचीच पुन्हा प्रचीती आलीय. 24 तासात तब्बल 232 मिमी. एवढ्या रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झालीय. विशेष म्हणजे हा पाऊस जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आहे.

Parbhani sheep death

heavy rain kills sheeps

राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट IMD ने 12 जुलै रोजी पाच दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केलाय. त्यातल्या पहिल्या दोन दिवसात मराठवाडा आणि कोकणात पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. पुढचे तीन दिवस अजूनही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळेच विदर्भ मराठवाड्यातही जनावरांची काळजी घेणं गरजेचं आहे.

14 आणि 15 जुलै रोजी राज्यात पावसाची काय स्थिती हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर, पुणे, ठाणे, पालघर, मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर जालना, औरंगाबाद लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीला येलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. (Parbhani heavy rain kills 233 sheep record break rain recorded in 24 hours)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.