AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashwini Paul: नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी मारुन स्वत:सह लेकरांना संपवणाऱ्या अश्विनी पौळ प्रकरणात मोठी अपडेट

Wrestler Ashwini Paul Naldurg Fort : राष्ट्रीय महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांसह धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावरून 100 फूट खोल दरीत उडी घेतली. याप्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर येत आहे.

Ashwini Paul: नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी मारुन स्वत:सह लेकरांना संपवणाऱ्या अश्विनी पौळ प्रकरणात मोठी अपडेट
अश्विनी पौळ प्रकरणात मोठी अपडेट Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 05, 2026 | 8:12 AM
Share

राष्ट्रीय महिला कुस्तीपटू अश्विनी पोळ यांनी परवा टोकाचे पाऊल उचलले. धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून आपल्या तीन लहान मुलांसह त्यांनी 100 फूट खोल दरीत उडी घतेली. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत अश्विनी पोळ, त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य जागीच ठार झाले तर जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरी मुलगी वीरा ही गंभीर असून तिच्यावर धारशिव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिच्या वडीलांनी पती आणि सासरकडील मंडळींविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यांच्या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणात आता पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

नवऱ्यासह सासऱ्याला पोलिसांनी केली अटक

कुस्तीपटू अश्विनी पौळ आत्महत्या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये नवरा सासू सासरा आणि नणंद अशा चार जनावर ती नळदुर्ग पोलीस गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पती मनोहर अंकुश पौळ, सासरे अंकुश पंढरीनाथ पौळ यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात अश्विनी पौळ यांच्या वडील तानाजी मोहिते यांनी काल पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. ते पेशाने शिक्षक आहेत.

उमरगा तालुक्यावर शोककळा

अश्विनी पौळ या राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट महिला कुस्तीपटू होत्या. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले होते. उमरगा तालुक्यातील व्हंताळ हे त्यांचे माहेर आहे. नळदुर्ग किल्ल्यावरील उपळी बुरूजावरून उडी मारून त्यांनी जीवन संपवले. तेजस्विनी मोहिते आणि आश्विनी मोहिते-पौळ या दोघी बहिणी लहानपणापासूनच कुस्तीचा फड गाजवत होत्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे व्हंताळ आणि माध्यमिक शिक्षण बलसूर येथे झाले होते. त्यांच्या वडीलांनी मुलींची कुस्तीची आवड पाहून मुलींना कुस्तीचे रीतसर धडे दिले होते.

अश्विनी यांनी राष्ट्रीय स्तरावर पाच सुवर्ण आणि सहा रौप्य पदकांची कमाई केली होती. पण लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात कुरबुरी सुरू झाल्या. पुढे नवरा-बायकोत खटके उडायला लागले. गेल्या काही महिन्यांपासून त्या तणावाखाली होत्या. पतीच्या सांगण्यावरून त्यांनी मुंबईत महाराष्ट्र सुरक्षा दलातील नोकरी सोडल्याचा आरोप तानाजी मोहिते यांनी केला. गेल्या तीन महिन्यांपासून त्या मुलांसह माहेरी राहत होत्या.

Follow Us
कृष्ण जन्माला गं आला बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्माला गं आला बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल