AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Crime | चंद्रपुरातील युवतीचे हत्या प्रकरण, मुख्य आरोपी गजाआड, दोन मैत्रिणींच्या द्वेषातून हत्या?

चंद्रपूर जिल्ह्यातील खळबळजनक युवती हत्याप्रकरणी मुख्य आरोपी गजाआड झालाय. शंकर कोरवनला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. भद्रावती शहरालगत तेलवासा भागात 4 एप्रिल रोजी शिर कापलेल्या अवस्थेतील विवस्त्र युवतीचे शव आढळले होते.

Chandrapur Crime | चंद्रपुरातील युवतीचे हत्या प्रकरण, मुख्य आरोपी गजाआड, दोन मैत्रिणींच्या द्वेषातून हत्या?
चंद्रपूरमधील तरुणीच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी गजाआडImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Apr 12, 2022 | 4:30 PM
Share

चंद्रपूर जिल्ह्यातील खळबळजनक युवती हत्याप्रकरणी मुख्य आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. शंकर कोरवन (Shankar Korvan) नामक मूळ भद्रावती (Bhadravati) येथे राहणाऱ्या आरोपीला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. जिल्ह्यातील भद्रावती शहरालगत तेलवासा (Telvasa) भागात 4 एप्रिल रोजी शिर कापलेल्या अवस्थेतील विवस्त्र युवतीचे शव आढळले होते. अतिशय गूढ – पुरावा नसलेल्या या घटनेत पोलिसांनी अथक प्रयत्नाने युवतीची ओळख पटवून तिच्या अल्पवयीन मैत्रिणीला अटक केली होती. तिच्या चौकशीत यातील बेपत्ता असलेले शिर दाताळा मार्गावर इरई नदीपात्रातून ताब्यात घेण्यात आले. मात्र यातील मुख्य आरोपी असलेल्या पुरुष साथीदार मात्र फरार होता. घटना झाल्यापासून परराज्यात फरार असलेल्या आरोपीला गुप्त माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी अटक केली.

दोन मैत्रिणींच्या द्वेषातून क्रूर हत्या

एकाच खोलीत वास्तव्याला असलेल्या दोन मैत्रिणींमध्ये सततच्या स्पर्धेतून – असूयेतून हत्येचा हा प्रकार घडल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले होते. मित्रांसमोर सातत्याने अपमान होत असल्याने अल्पवयीन मैत्रिणीने आपल्या मित्राच्या मदतीने अंगावर शहारे आणणारा प्रकार घडवून आणला. मात्र केवळ 2 व्यक्तींनी ही हत्या केली यावर अजूनही शंका व्यक्त केली जात आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी दिली.

नदीपात्रातून शिर ताब्यात

चंद्रपूरच्या गुन्हे शाखेच्या पथकानं अथक प्रयत्नातून युवतीची ओळख पटवली. पोलिसांनी तिच्या अल्पवयीन मैत्रिणीला अटक केली होती. यातील बेपत्ता असलेले शिर दाताळा मार्गावर इरई नदीपात्रातून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र यातील मुख्य आरोपी असलेल्या पुरुष साथीदार मात्र फरार होता. घटना झाल्यापासून परराज्यात फरार असलेल्या आरोपीला सापळा रचून पोलिसांनी अटक केली. एकाच खोलीत वास्तव्याला असलेल्या दोन मैत्रिणींमध्ये सततच्या स्पर्धेतून हत्येचा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.

NCP’s mission | राष्ट्रवादी काँग्रेसचं मिशन विदर्भ! पश्चिम विदर्भात शरद पवार घेणार शिबिर, जयंत पाटलांची माहिती

Sujat Ambedkar: ‘सुशिक्षित’ असून चालत नाही ‘सुजाण’ सुद्धा असावं लागतं, मनसे, हिंदू महासंघाचा सुजात आंबेडकरांवर निशाणा

Sushil Kumar Shinde: यूपीएच्या अध्यक्षपदासाठी पवारांचे नाव चर्चेत, पण जागा खाली नाहीये; सुशीलकुमार शिंदेंचा टोला

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली