Sushil Kumar Shinde: यूपीएच्या अध्यक्षपदासाठी पवारांचे नाव चर्चेत, पण जागा खाली नाहीये; सुशीलकुमार शिंदेंचा टोला

Sushil Kumar Shinde: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचे यूपीएच्या (upa) अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादीच्या युवक आघाडीनेही त्याबाबतचा ठराव केला आहे. त्यामुळे शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यावर मोठं विधान केलं आहे.

Sushil Kumar Shinde: यूपीएच्या अध्यक्षपदासाठी पवारांचे नाव चर्चेत, पण जागा खाली नाहीये; सुशीलकुमार शिंदेंचा टोला
यूपीएच्या अध्यक्षपदासाठी पवारांचे नाव चर्चेत, पण जागा खाली नाहीये; सुशीलकुमार शिंदेंचा टोलाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 12:32 PM

पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचे यूपीएच्या (upa) अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादीच्या युवक आघाडीनेही त्याबाबतचा ठराव केला आहे. त्यामुळे शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यावर मोठं विधान केलं आहे. यूपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचे नाव चर्चेत असलं तरी अध्यक्षपदासाठी जागाच खाली नाहीये, असा चिमटा सुशील कुमार शिंदे (sushil kumar shinde) यांनी काढला आहे. तसेच जाती धर्माचे राजकारण या देशात चालत नाही. पुन्हा पुन्हा जाती धर्माचे राजकारण चालणार नाही, असं राज ठाकरे यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शिंदे यांनी म्हटलं आहे. राजीव गांधी ई लर्निंग स्कुलच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थित होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

सुशील कुमार शिंदे यांनी यावेळी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या विधानावर बोलणं टाळलं. तुम्ही त्यांनाच विचारा, असं शिंदे म्हणाले. पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं. पवार साहेब ही काळाची गरज आहे. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं होतं. त्यावर शिंदे यांनी बोलणं टाळलं.

दंगलीचा आणि जातीचा संबंध नाही

सध्या सुरू असलेल्या सुडाच्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केलं. आम्ही जो काळ अनुभला आहे, त्यावेळी संयम होता. मात्र परिस्थिती सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर, उच्चवर्णीय लोकच दंगल घडवतात या सुजात आंबेडकर यांच्या विधानाशी त्यांनी असहमती दर्शवली. दंगलीचा आणि जातीचा काही संबध नाहीये, असं ते म्हणाले.

पवार काय म्हणाले होते?

चार दिवसांपूर्वी शरद पवार कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी त्यांना यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत विचारण्यात आले. त्यावर मला त्यात काहीच स्वारस्य नाही, असं पवार म्हणाले.

संबंधित बातम्या:

Dilip Walse Patil: तुमची सेक्युरिटी असलेले लोक कुठे आहेत हे केंद्राला विचारणार; दिलीप वळसे पाटील यांचं मोठं विधान

Maharashtra News Live Update : कुख्यात डॅान अरुण गवळीची पॅरोलसाठी हायकोर्टात धाव

Pandharpur Accident | पंढरपूरला निघालेली भक्तांची गाडी उलटली, तळेगावचे 19 भाविक जखमी

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.