Maharashtra News Live Update : किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढल्या, आजही कोर्टात पदरी निराशा

| Updated on: Apr 13, 2022 | 6:45 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढल्या, आजही कोर्टात पदरी निराशा
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज मंगळवार 12 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसावरून राज्यात चांगलेचं वातावरण तापले आहे. मुंबईतील मालवणी भागात तणावाची स्थिती निर्माण झाल्याची पाहायला मिळाली. नमाज पठणादरम्यान मशिदीसमोर लाउडस्पीकरवर गाणी लावणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांसह ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Apr 2022 07:32 PM (IST)

    Raj Thackeray Speech LIVE : राज ठाकरेंचं ठाण्यातलं संपूर्ण भाषण पाहा

  • 12 Apr 2022 05:09 PM (IST)

    शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे Live

    चित्रा वाघ यांनी सुसाईड नोट लिहायला लावली

    कोणताही विचार न करता राजकारण केलं गेलं

    पीडितीला कुणी मदत केली नाही हा चुकीचा आरोप

    अशा घटना घटल्या त्यावेळी पोलिसांनी दखल घेतली आहे

    दिरंगाई झाली असेल तर लक्ष घालणं सर्वाचं काम आहे

    त्या रोज ज्या वेगवेगळ्या गोष्टी वाहिन्यांवर बोलत होत्या त्याचा मुलीवर काही परिणाम झाला आहे का याचीही माहिती घेतली पाहिजे

    पीडितीने जबाब का बदलला हे तपासात समोर येईलच

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील या प्रकरणात लक्ष घातलतील

    मुलींचा असा वापर करणं हे चुकीचं आहे

    आपण न्यायव्यवस्था आहोत हे सांगणं चुकीचं

  • 12 Apr 2022 05:01 PM (IST)

    रघुनाथ कुचिक प्रकरण : पीडितेचे चित्रा वाघ यांच्यावर पुन्हा आरोप

    चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप खोटे

    पोलिसांनी माझी चौकशी करावी, सीडीआर काढावेत, आणि चित्रा वाघ यांचीही चौकशी करावी

    चित्रा वाघ फेसकॉलवर माझ्याशी बोलायच्या, आणि मला मेसेज पाठवायला लावायच्या

    त्यांनी जे मेसेज वाचून दाखवले ते त्यांनीच मला पाठवायला सांगितले होते

    त्यांच्या सांगण्यानुसारच मी त्यांना मेसेज पाठवत होते

  • 12 Apr 2022 04:11 PM (IST)

    भाजप नेत्या चित्रा वाघ Live

    चित्रा वाघ यांनी शिवसेना नेत्यावर खोटे आरोप करयाला लावल्याचा आरोप

    शिवसेना नेत्यावर केलेले अत्याचाराचे आरोप

    एक मुलगी एकटी लढत होती, तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत असल्याची तक्रार माझ्याकडे आली

    एखादी मुलगी पुराव्यासहीत सांगत आहे, मला काय माहिती कुठलं हॉस्पिटल कुठे आहे. ही माहिती सर्व त्या मुलीने मला दिली

    हे कळाल्यावर मला कळालं एकटी आहे

    म्हणून मी तिच्यासोबत उभा राहिली ही चूक आहे का

    पोलीस कसा त्रास देत आहेत हेही सांगितलं

    परवा तिला चालता येत नव्हतं, मी डॉक्टरांनी तिच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगितलं

    मी सांगितलं ससूनला जायचं आहे, तर ती जाहंगीरला गेली

    या सगळ्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे

    कोणही तिच्या बरोबर नव्हतं मी एकटी लढली

    विद्या चव्हाण डोक्यावर पडल्यागत काहीही काय सांगतात

    आणि आज माझ्यावर खोटे आरोप करतात

    ति कुठल्या मजबुरीत का ती हे करती आहे हे मला माहिती नाही

    ती एकटी लढते आहे, म्हणून मी तिच्या सोबत उभा राहिली

    हे सगळं करून माझा आवाज बंद होणार नाही

    मला केसमध्ये अडकण्याचा प्रयत्न होत आहे

    मात्र माझी सर्व तयारी आहे

    माझ्या घरावरही हल्ले झाले

    माझा सीडीआर रिपोर्टही पोलीस काढू शकतात

    पीडितेचा मेसेज मी तसाच्या तसा गृहमंत्र्यांना पाठवला

  • 12 Apr 2022 03:17 PM (IST)

    प्रवीण दरेकर Live

    वैफल्याग्रस्त भावनेतून हे सर्व सुरू आहे

    अलिकडच्या काळात मला न्यायालतीय अनुभव मिळत आहे

    हायप्रोफाईल केसल सेशन कोर्ट जामीन देताना दिसत नाही

    त्यामुळे सोमय्या हायकोर्टात जातील आणि त्यांना न्याय मिळेल हा विश्वास

  • 12 Apr 2022 03:14 PM (IST)

    प्रवीण दरेकर Live

    सरकार मुद्दाम भूमिका बदलायला लावत आहे

    चित्राताई दबाव टाकत आहेत हे चुकीचं आहे

    सरकारने केलेला हा बनाव असू शकतो

    चित्रा वाघ महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या नेत्या आहेत

    प्लॅन करून असे काही उभं करणं महिलांच्या हक्कासाठी ठीक नाही

    राष्ट्रवादीचे नेते असेच आरोप करणार

    राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पर्दाफाश केल्याने ते चित्रा वाघ यांचंं कौतुक तर करणार नाहीत

  • 12 Apr 2022 03:08 PM (IST)

    प्रवीण दरेकर Live

    मला अडकवण्याचा डाव होता

    माझ्यावर सूड उगावण्याचा प्रयत्न होता

    त्यांचे नेते अडकत आहेत म्हणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न

    किरीट सोमय्या आणि माझ्याविरोधात षडयंत्र

    आज यांचा दबाव न्यायालयाने झिडकारून लावला आणि आम्हाला न्याय दिला

    किरीट सोमय्या पळणारा नाही, पळवणारा नेता आहे

    सेशन कोर्टात जामीन नाही मिळाल्यास हायकोर्टात जामीन मागता येतो

    त्यांना वाटल्यास ते चौकशीला सामोरे जातील

    संजय राऊतांचा अजेंडा असा आहे

    आमचा नेते जेलमध्ये टाकल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही

    संजय राऊतांच्या प्राध्यान्याचा विषयच हा आहे

    सोमय्या चौकशीला सामोरे जातील,

    ते काही आतंकवादी नाहीत, माजी खासदार आहेत

    त्यांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न हे करत आहेत

    केवळ दहशत माजवण्याचा प्रयत्न होतोय

    पोलिसांना मुद्दाम हे टास्क देण्यात आलं आहे

    सोमय्यांनी जीवाची परवा न करता घोटाळे बाहेर काढले

  • 12 Apr 2022 02:00 PM (IST)

    कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीला चुरशीने मतदान

    कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक

    कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीला चुरशीने मतदान

    दुपारी एकवाजेपर्यंत सरासरी ३४.१८ % मतदान

    एकूण ९९ हजार ७३२ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

    ५४ हजार ३६३ पुरुष तर, ४५ हजार ३६८ महिला मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

  • 12 Apr 2022 01:16 PM (IST)

    महाविकास आघाडीने मला मुद्दास त्रास दिला -प्रवीण दरेकर

    महाविकास आघाडीने मला मुद्दास त्रास दिला

    महाविकास आघाडी सरकार हस्तक्षेप करीत होत

    कुणाला काय वाटलं तरी मनामानी करता येत नाही

    पहिल्या दिवसांपासून पोलिस मुद्दाम त्रास देत होते

    एकमेकांशी कसे संपर्क साधले, कसा त्रास दिला

    विरोधात बोलत असल्याने तोंड दाबण्याचा प्रयत्न केला होता

    मी जेव्हा-जेव्हा पोलिसांनी बोलावलं, तेव्हा मी पोलिसांकडे हजर राहिलो.

    चौकशीला सहकार्य केलं

    हे जाणीवपूर्वक केलं जात आहे

    न्यायदेवतेने दिलासा दिला आहे.

  • 12 Apr 2022 01:06 PM (IST)

    प्रवीण दरेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर

    प्रवीण दरेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर

    सरकारला तोंडावर आपटण्याची सवय झाली

    यांना तोंड दाखवण्यासाठी जागा उरलेली नाही

    लोकांचे शिव्याशाप घ्यायची सवय झाली आहे

    पोलिसांशी हाताशी केसेस तयार करीत आहेत

    आम्हाला दिलासे मिळतील आणि परंतु हे जेलमध्ये जातील एव्हढं निश्चित

    माज आलेलं हे सरकार आहे

    आतातरी सरकारने डोळे उघडावे

    सुडबुध्दीने त्रास दिला जात आहे

    धनंजय शिंदे

    काही सुडबुध्दीने नाही

    प्रवीण दरेकर हे अध्यक्ष

  • 12 Apr 2022 10:33 AM (IST)

    नागपूर विभागातील १०० पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी गोळा केले होते पैसे

    - नागपूर विभागातील १०० पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी गोळा केले होते पैसे

    - प्रत्येक संपकरी कर्मचाऱ्यांकडून ३०० रुपये गोळा केल्याची माहिती

    - नागपूर विभागातून जवळपास ५० हजार रुपये गोळा झाल्याची माहिती

    - ॲड गुणरत्न सदावर्ते यांना देण्यासाठी पैसे गोळा केल्याची माहिती

    - स्वखुशीने पैसे दिल्याचा काही एसटी कर्मचाऱ्यांचा दावा

  • 12 Apr 2022 10:25 AM (IST)

    आम्ही कधीही कमरेखाली वार करीत नाही - किरीट सोमय्या

    संबंधित प्रकरणाचा पोलिस तपास करीत आहे

    प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे

    निवृत्त अधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे

    हवेत काही बोलायचं सोडून द्या

    हा पोलिस तपासाचा भाग आहे

    तुमच्या मनात काय भीती नसेल तर काय अडचण नाही

    गुन्हेगाराने कायद्याचं पालन केलं पाहिजे

    लोकांना धमक्या देऊन ईडीकडून पैसे घेतले आहेत

    थायलंडमध्ये कोणी पैसे जमा केले ते सुध्दा लवकरचं बाहेर येईल

    तिथे पैसे जमा करायचे

    आम्ही कधीही कमरेखाली वार करीत नाही

    आमच्यावर संस्कार आहे, कुणाच्या कुटुंबावर वार करायचे नाहीत

    कंबर त्यांची मोडणार आहे

    न्यायालयाची गोष्ट आहे

    तुम्ही किती महान आहात हे लवकरचं बाहेर येईल

  • 12 Apr 2022 08:53 AM (IST)

    कुख्यात डॅान अरुण गवळीची पॅरोलसाठी हायकोर्टात धाव

    - कुख्यात डॅान अरुण गवळीची पॅरोलसाठी हायकोर्टात धाव

    - पत्नी आजारी असल्याने मागीतला पॅरोल

    - पॅरोलचा अर्ज विभागीय आयुक्तांनी नामंजुर केल्यानंतर हायकोर्टात घाव

    - उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला नोटीस

    - २९ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश

    - शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी अरुण गवळी नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत

  • 12 Apr 2022 08:53 AM (IST)

    महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात पेट्रोल डिझेलचे दर कमी

    - महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात पेट्रोल डिझेलचे दर कमी

    - महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात पेट्रोल 10 रुपयांनी तर डिझेल 9 रुपयांनी स्वस्त

    - महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिक कर्नाटकातून भरतात पेट्रोल

    - सीमाभागातील महाराष्ट्राच्या हद्दीतील पेट्रोलपंप डबघाईला आले

  • 12 Apr 2022 08:41 AM (IST)

    शिवसेना राष्ट्रवादीमध्ये विलीनकरण फक्त बाकी आहे - अमेय खोपरकर

    शिवसेना राष्ट्रवादीमध्ये विलीनकरण फक्त बाकी आहे

    राऊतांचा सकाळी लाफ्टर शो असतो

    अमेय खोपरकरांची राऊतांवर टीका

    आम्ही जात धर्म पाहत नाही

    तुम्ही जितके आतुर आहात, आम्ही सुध्दा तितके आतुर आहोत

    उत्तर जवाब नक्की मिळणार

  • 12 Apr 2022 07:27 AM (IST)

    कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान, 357 केंद्रांवर पार पडणार मतदान प्रक्रिया

    कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान, 357 केंद्रांवर पार पडणार मतदान प्रक्रिया

    मतदान केंद्रांवर सर्व यंत्रणा सज्ज

    थोड्याच वेळात होणार मतदानाला सुरुवात

    पोटनिवडणुकीच्या निमित्ताने गेल्या पंधरा दिवसांपासून ढवळून निघाले कोल्हापुरातील राजकारण

    चुरशीने मतदान होण्याचा अंदाज

  • 12 Apr 2022 07:26 AM (IST)

    गडचिरोली दोन राज्यांना जोडणारा गोदावरी पूल आता धोक्याची घंटा

    गडचिरोली दोन राज्यांना जोडणारा गोदावरी पूल आता धोक्याची घंटा

    महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याला जोडणारा गोदावरी नदीवर शासनाने चार वर्षे अगोदर पुल तयार करण्यात आला

    परंतु काही ठिकाणी या पुलाला भेदा पडल्यामुळे पुलातुन सलाख स्टील बाहेर पडलेले आहेत

    प्रवास करणाऱ्या वाहनांचे बाहेर पडलेल्या या सलाख स्टील मुळे मोठे नुकसान होत आहे

    गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा एकमेव असलेल्या पुलाला ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी

    अशी मागणी गावकरी व स्थानी करीत आहे

    सार्वजनिक बांधकाम विभागाचा या कामाकडे दुर्लक्ष

  • 12 Apr 2022 07:26 AM (IST)

    नागपूर मेट्रोच्या लिफ्टिंग होलमधून चक्क वाळू पडतेय

    - नागपूर मेट्रोच्या लिफ्टिंग होलमधून चक्क वाळू पडतेय

    - व्हायरल व्हीडीओ मुळे नागपूर मेट्रोच्या कामावर प्रश्नचिन्ह

    - नागपूर मेट्रोच्या लिफ्टिंग होलमधून वाळू पडत असल्याचा व्हीडीओ व्हायरल

    - नागपुरात इंदोरा चौक ते १० नंबर पुलीया दरम्यान १०७ न १०८ पिलर वाळू पडतेय

    - यापूर्वी सुद्धा नागपूर मेट्रोच्या कामावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते

  • 03 Mar 2022 06:25 AM (IST)

    युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन आणखी एक विमान दिल्लीत दाखल

    ऑपरेशन गंगा: युक्रेनमध्ये अडकलेल्या 200 भारतीय नागरिकांना घेऊन आणखी एक विमान रोमानियाहून दिल्लीला पोहोचले.

Published On - Apr 12,2022 6:21 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.