Pandharpur Accident | पंढरपूरला निघालेली भक्तांची गाडी उलटली, तळेगावचे 19 भाविक जखमी

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील 19 भाविक चैत्र वारीच्या निमित्ताने पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी निघाले होते. यावेळी पिकअप वाहन उलटून अपघात झाला.

Pandharpur Accident | पंढरपूरला निघालेली भक्तांची गाडी उलटली, तळेगावचे 19 भाविक जखमी
पुण्यातील भाविकांची पिक अप गाडी पंढरपूरजवळ उलटलीImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 11:52 AM

पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या गाडीला अपघात (Pick Up Vehicle Accident) झाला. पुण्याहून निघालेल्या भक्तांची गाडी अपघातग्रस्त झाली. पिक-अप वाहन रस्त्यात उलटून हा भीषण अपघात झाला. यामध्ये 19 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात वेळापूर-पंढरपूर रस्त्यावर (Pandharpur Solapur Accident) ही घटना घडली आहे. चैत्र वारीच्या निमित्ताने पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या (Vitthal Rukmini) दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाला. सोमवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

नेमकं काय घडलं?

विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला सोलापुरात अपघात झाला. पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील 19 भाविक चैत्र वारीच्या निमित्ताने पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी निघाले होते. यावेळी पिकअप वाहन उलटून अपघात झाला.

गाडी चालकाला वाहन नियंत्रित करता न आल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. वेळापूर पंढरपूर रोडवरील पिराचि कुरोलि गावाजवळ हा अपघात झाला.

19 भाविक जखमी

पिक अप गाडी पलटी झाल्यामुळे 11 भाविक किरकोळ जखमी झाले, तर आठ भाविकांना गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे . सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

संबंधित बातम्या :

Nashik VIDEO | चालत्या गाडीखाली साधू महाराज सापडले, बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकला, पण नंतर…

Washim Accident : वाशिम अनियंत्रित कार झाडावर आदळली, अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी

BEST Bus Accident | बेस्ट बसची धडक, मुंबईत 29 वर्षीय बाईकस्वाराचा मृत्यू

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.