Washim Accident : वाशिम अनियंत्रित कार झाडावर आदळली, अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी

मयत अनिकेत मालनकर हे आपल्या पत्नीसोबत आपल्या कारने अनसिंग येथून मेहकर येथे जात होते. वाशिम-पुसद महामार्गावरुन जात असतानाच जाग माथा परिसरात मालनकर यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. अपघात इतका भीषण होता की अनिकेत मालनकर यांचा जागीच मृत्यू झाला.

Washim Accident : वाशिम अनियंत्रित कार झाडावर आदळली, अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी
वाशिम अनियंत्रित कार झाडावर आदळली
Image Credit source: TV9
विठ्ठल देशमुख

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Apr 11, 2022 | 11:19 PM

वाशिम : कार झाडावर जाऊन आदळल्याने झालेल्या भीषण अपघाता (Accident)त एक जण जागीच ठार (Death) तर एक जण गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना आज सायंकाळी वाशिममध्ये घडली आहे. अनिकेत मालनकर असे मयताचे नाव आहे तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला उपचारासाठी वाशिमच्या रुग्णालयात दाखल करण्याच आले आहे. कार चालकाचे वाहनावरीत नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून अपघात झाला. याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. (One person was killed and another was injured when an uncontrolled car collided with a tree in Washim)

गाडीवरील ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली

मयत अनिकेत मालनकर हे आपल्या पत्नीसोबत आपल्या कारने अनसिंग येथून मेहकर येथे जात होते. वाशिम-पुसद महामार्गावरुन जात असतानाच जाग माथा परिसरात मालनकर यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. अपघात इतका भीषण होता की अनिकेत मालनकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच वाशिम ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतेदह ताब्यात शवविच्छेदनासाठी पाठवला तर गंभीर जखमीला उपाचारासाठी वाशिमच्या रुग्णालयात दाखल केले.

सोलापूरमध्येही वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॉलीसह ट्रॅक्टर उलटला

सोलापूरमध्येही वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटल्याची घटना घडली आहे. चढावरुन येताना ट्रॅक्टर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या बाजूला उलटला. यामध्ये ट्रॅक्टर चालक जखमी झाला. सदर ट्रॅक्टर वीटाकडून करमाळ्याकडे चालला होता. (One person was killed and another was injured when an uncontrolled car collided with a tree in Washim)

इतर बातम्या

VIDEO : हिंगोलीत रामनवमीच्या मिरवणुकीत पोलिसांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

Video : महिला झेडपी सदस्याच्या पतीची शिव्या देत तरुणांना मारहाण, नागपूरच्या उमरेड परिसरात राडा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें