VIDEO : हिंगोलीत रामनवमीच्या मिरवणुकीत पोलिसांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

रामनवमीच्या निमित्ताने रामभक्तांनी औंढा शहरामध्ये मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत शिवसेना संतोष बांगर यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डिजेच्या तालावर ठेका धरला होता. यावेळी नाचत असतानाच आमदार संतोष बांगर हे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्यावरुन पैसे ओवाळून टाकताना दिसत आहेत.

VIDEO : हिंगोलीत रामनवमीच्या मिरवणुकीत पोलिसांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल
हिंगोलीत रामनवमीच्या मिरवणुकीत पोलिसांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल
Image Credit source: TV9
रमेश चेंडके

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Apr 11, 2022 | 9:24 PM

हिंगोली : रामनवमीनिमित्त रविवारी हिंगोलीत मिरवणुकीत काढण्यात आली होती. या मिरवणुकीत पोलिसांनीही ठेका धरल्याचे पहायला मिळाले. औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे रामनवमी (Ram Navami)च्या मिरवणुकीत पोलिस सहकाऱ्यांना सोबत घेऊन गर्दीमध्ये राजकारण्यांच्या तालावर थिरकताना दिसले. तेथे उपस्थित रामभक्तांनी हा नाच आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे. संबंधित आमदार त्यांच्यावर पैसेही उधळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलिसांचे या कृत्यावर काय कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Police dance during Ram Navami miravnuk in Hingoli goes viral on social media)

आमदार संतोष बांगर यांच्यासह पोलिसांनी धरला ठेका

रामनवमीच्या निमित्ताने रामभक्तांनी औंढा शहरामध्ये मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत शिवसेना संतोष बांगर यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डिजेच्या तालावर ठेका धरला होता. यावेळी नाचत असतानाच आमदार संतोष बांगर हे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्यावरुन पैसे ओवाळून टाकताना दिसत आहेत. मिरवणुकीत उपस्थित रामभक्तांनी ही दृश्ये आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गृहमंत्री पोलिसांवर काय करणार हे पाहणे औत्सुक्याचे

ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, ते पोलीसच जर असे कृत्य करीत असतील तर पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनात काय आदर उरणार असा सवाल उपस्थित होतोय. औंढा पोलीस ठाणे अंतर्गत अनेक अवैध व्यवसाय सुरू असताना त्यावर अंकुश मिळवायचे सोडून पोलिस करीत असलेले चाळे समाजात शांतता सुवव्यवस्था प्रस्थापित करतील का ? असा प्रश्न पडला आहे. आता राज्याचे गृहमंत्री यावर काय कारवाई करतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. (Police dance during Ram Navami miravnuk in Hingoli goes viral on social media)

इतर बातम्या

Video : महिला झेडपी सदस्याच्या पतीची शिव्या देत तरुणांना मारहाण, नागपूरच्या उमरेड परिसरात राडा

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील यांच्यासह चौघांविरोधात अकोल्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें