Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील यांच्यासह चौघांविरोधात अकोल्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

विजय मालोकार यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात मेलोकार यांनी अकोट पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील यांच्यासह चौघांविरोधात अकोल्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
गुणरत्न सदावर्तेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 8:23 PM

अकोला : अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांच्यासह त्यांची पत्नी अॅड. जयश्री पाटील (Adv. Jayashree Patil) व अन्य 2 जणांविरुद्ध अकोट शहर पोलिसांत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विजय मालोकार यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात मेलोकार यांनी अकोट पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी मागील 5 महिन्यांपासून बेकायदेशीरपणे संप सुरु केला आहे. या संपादरम्यान कर्मचारी पदाधिकारी हे वेगवेगळ्या लोकांमार्फत आर्थिक शोषण करुन कर्मचाऱ्यांची फसवणूक करत आहेत. कर्मचारी आधीच संपामुळे व वेतन न मिळाल्याने आर्थिक विवंचनेत असून त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत असल्याची तक्रार अकोट शहर पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र एसटी कामगार सेना संघटना कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी दाखल केली आहे. (Fir registrered against four people in akot police station including gunratna sadavarte and jayashree sadavarte)

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखीनच वाढ

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी ॲड. जयश्री पाटील व अन्य 2 जणांविरुद्ध अकोट शहर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याने सदावर्ते यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र एसटी कामगार सेना संघटना कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी दाखल केलेल्या तक्रारींमध्ये एसटी महामंडळात बेकायदेशीर पध्दतीने संपाची नोटीस देऊन संपाला सुरवात झाली. संप काळात बहुतांश कर्मचाऱ्यांची राज्य शासनात विलिनीकरणाची इच्छा असल्याने मोठ्या प्रमाणात कर्मचारी सदर संपामध्ये सहभागी झाले. त्यामुळे एसटी प्रशासनाने भागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्त व आवेदन कार्यपद्धती इतर प्रशासकीय कार्यवाही करण्यास सुरवात केली. यातच संपकरी कर्मचाऱ्यांना निलंबित व बदली करण्याचे आदेश राज्य परिवहन प्रशासनाने काढले त्यातून सुटका व्हावी याकरीता कर्मचाऱ्यांमार्फत प्रयत्न सुरु झाले होते.

एसटी कर्मचाऱ्यांकडून 3 करोड रुपये गोळा केल्याचा गंभीर आरोप

कर्मचाऱ्यांच्या सदर अडचणीचा गैरफायदा घेऊन अजयकुमार बहाद्दरसिंग गुजर (45) आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात प्रकरण दाखल करुन प्रशासनाद्वारे होत असलेली कार्यवाही रद्द करुन देतो, अशा खोट्या भूलथापा देऊन कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 300 रुपये तथा 500 रुपये जमा केले असून त्यामध्ये राज्यभरातील जवळपास 70 हजार एसटी कर्मचाऱ्यांकडून 3 करोड रुपये गोळा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अकोट आगाराचे गजानन रामभाऊ बढे आणि अकोट आगाराच्या इतर कर्मचाऱ्यांद्वारे संकलित केलेले 74 हजार 400 रुपये 14 नोव्हेंबर 2021 रोजी अकोट डेपो येथे वाहक म्हणून नेमणूकीवर असलेल्या प्रफुल्ल गावंडे यांनी अजयकुमार गुजर यांचे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीनुसार ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी ॲड. जयश्री पाटील, अजयकुमार गुजर, प्रफुल्ल गावंडे यांच्याविरुद्ध भादवी 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Fir registrered against four people in akot police station including gunratna sadavarte and jayashree sadavarte)

इतर बातम्या

Jalgaon Accident : जळगावमध्ये मुंबई-नागपूर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात

धक्कादायक ! आधी पत्नी आणि मुलाची हत्या केली, मग हत्येचे व्हिडिओ फोटो स्टेटसला ठेवले; वाचा नेमके काय घडले ?

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.