मराठावाडा आणि विदर्भाला जोडणारा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याला पाहिलं जातं. 1 मे 1999ला परभणीचं विभाजन झाल्यानंतर हिंगोली जिल्हा अस्तित्वात आला. पूर्वी हिंगोलीवरही निजामांचं वर्चस्व होतं. निजामाचे सैनिक हिंगोलीत वास्तव्याला असायचे. या सैनिकांवर हिंगोलीत उपचार होत असत. पशुचिकित्सा आणि शस्त्रक्रियाही हिंगोलीत होत असत. हिंगोलीने दोन लढाया अनुभवल्या आहेत. एक म्हणजे 1803मध्ये टिपू सुल्तान आणि मराठ्यांमध्ये झालेली आणि दुसरी म्हणजे 1857मधील भोसल्यांसोबतचे युद्ध. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 4,526 कि.मी. एवढे आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या 1,177,345 एवढी आहे. 2011 सालापर्यंत हा जिल्हा सिंधुदुर्ग आणि गडचिरोली नंतर महाराष्ट्रातील 36 पैकी तिसरा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. 12 ज्योर्तिलिंगामधले औंढा नागनाथ हे ज्योर्तिलिंग या जिल्हयात असल्याने वेगळा दर्जा या शहराला मिळाला आहे. दसरा महोत्सवाकरिता हिंगोली प्रसिद्ध आहे. 160 वर्षांपासूनची या जिल्ह्याला दसरा महोत्सवाची परंपरा आहे. ज्वारी आणि कापुस ही मुख्य पिकं या भागात घेतली जातात. गोंधळ, शाहिरी, भारूड, पोतराज, कलगितुरा या लोककला आजही इथं जिवंत आहेत. औंढा नागनाथ, सिद्धेश्वर बांध, तुळजादेवी संस्थान, संत नामदेव संस्थान, मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर, इसापूर धरण आदी हिंगोलीतील पर्यटन स्थळं प्रसिद्ध आहेत. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ आणि बसमत अशी पाच तालुके आहेत. या जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी आणि वसमत हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.
खरीप हंगाम आता तोंड़ावर आला आहे. पाऊस पडला की शेतकरी हे चाढ्यावर मूठ ही ठेवरणारच आहेत. पण त्यापूर्वीच विविध अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. ...
खरीप हंगामात उत्पादन वाढीसाठी डीएपी खतालाच अधिकची मागणी असते. शेतकऱ्यांच्या या मागणीचाच गैरफायदा हे विक्रेत्ये घेत आहेत. या खताची मूळ किंमत यंदा 1 हजार 350 ...
वर्षा गायकवाड यांना राजकीय मतभेदावर प्रतिक्रिया विचारली असता, राजकारण करण्याची ही वेळ नाहीये. माझा भाऊ मी एक वर्षांपूर्वीच गमावला असं म्हणून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न ...
हिंगोली येथे काम आटोपून ते रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास परत गावाकडे निघाले होते. यावेळी हिंगोली ते नरसी नामदेव मार्गावर राहोली पाटीजवळ सेनगावकडून भरधाव वेगानं ...
या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचं कमाल वय 38 वर्षे असावं. नोकरीचे ठिकाण हिंगोली असणार आहे. या पदांसाठी जर एमबीबीएस उमेदवार उपलब्ध झाले नाही आणि पदं ...
अवकाळी पावसामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली होती. असे असताना नुकसानभरपाई म्हणून सोयाबीनसाठीच सर्वाधिक मदत शेतकऱ्यांना मिळाली आहे. शिवाय पदरी पडलेल्या पिकाची मोठ्या प्रमाणात विक्रीही झाली ...
शिवसेनेवर आरोप करताना अॅड. शिवाजी माने म्हणाले, ' हिंदुत्वासाठी लढणारे आम्ही . त्यावेळेस होतो आमच्या रक्ताने -कष्टाने शिवसेना उभी राहिलेली आहे. मी तर सुरुवात आहे ...