AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hingoli News : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना थंडीच्या कडाक्यात झोपवले जमिनीवर; धक्कादायक प्रकारानंतर यंत्रणा खडबडून जागी, संतोष बांगर यांच्या भूमिकेने आश्चर्य

Hingoli Women Sleep on the Ground : हिंगोलीतील आरोग्य विभागाची लक्तरं वेशीला टांगल्या गेली. भर थंडीत शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना जमिनीवर झोपवल्या गेले. याविषयीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. तर आमदार संतोष बांगर यांच्या भूमिकेने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

Hingoli News : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना थंडीच्या कडाक्यात झोपवले जमिनीवर; धक्कादायक प्रकारानंतर यंत्रणा खडबडून जागी, संतोष बांगर यांच्या भूमिकेने आश्चर्य
| Updated on: Dec 14, 2024 | 3:32 PM
Share

हिंगोलीतील आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. भर थंडीत शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना जमिनीवर झोपवल्या गेले. 13 डिसेंबर रोजी कुटुंब कल्याण योजना शिबिरात महिलांना थंडीच्या काळात थेट जमिनीवर झोपावे लागले. थंडगार फरशीवर महिलांना झोपण्याची व्यवस्था केल्याचा व्हिडिओ समोर आला. शस्त्रक्रियेनंतर झोपण्यासाठी रुग्णालयात कॉट उपलब्ध नसल्याने महिलांना जमिनीवर झोपण्याची वेळ आली. कळमनुरी तालुक्यातील बाळापूर ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार घडला. याविषयीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. चूक दुरूस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण या घटनेवर आमदार संतोष बांगर यांच्या भूमिकेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

काय घडली घटना

काल शुक्रवारी ग्रामीण भागातील महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. पण बेड नसल्याने यातील 43 महिलांना थेट फरशीवर झोपवण्यात आले. ऐन थंडीच्या कडाक्यात महिलांना फरशीवर झोपावे लागले. आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार समोर आला. या सर्व घटनेनंतर नागरिकांनी आरोग्य खात्यावर रोष व्यक्त केला. शस्त्रक्रियेनंतर स्वच्छेतेबाबतही काळजी न घेतल्याने नाराजीचा सूर वाढला. पण यंत्रणा हालली नाही. पण जेव्हा याविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यावेळी यंत्रणा खडबडून जागी झाली. या हलगर्जीपणाबाबत रुग्णालयावर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येत आहे.

नातेवाईकांना अश्रू अनावर

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्यानंतर तब्बल 43 महिलांना जमिनीवरती झोपवण्यात आले. आता महिलांना डिस्चार्ज करण्यात आलं आहे. महिलांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असत्या. नातेवाईकांना त्यांचे अश्रू लपवता आले नाही. पण यंत्रणेला सुरुवातीला कोणताही पाझर फुटला नाही. वृत्त समोर आल्यानंतर यंत्रणा जागी झाली.

यंत्रणा खडबडून जागी, चुक सुधारली

बाळापुर घटनेनंतर आरोग्य विभाग खड़बडून जागा झाला. जिल्हा शल्यचिकित्सकांसह जिल्ह्याच पथक बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल घडलेल्या घटनेनंतर अधिकचे 20 बेड वाढवणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक नितिन तडस यांनी दिली आहे.

संजय बांगर यांची प्रतिक्रिया काय?

आखाडा बाळापूर येथे घडलेला प्रकार धक्कादायक नाही. त्यात आरोग्य विभागाने कोणताही हलगर्जीपणा केला नाही, अशी प्रतिक्रिया आमदार संतोष बांगर यांनी दिली. येथील आरोग्य केंद्राला, रुग्णालया आपण अनेकदा भेट दिली. महिलांची संख्या जास्त होती आणि वेळ कमी असल्याने जमिनीवर गाद्या टाकून महिलांची सोय करण्यात आल्याची भूमिका त्यांनी घेतली.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?