AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी विलीनीकरणाच्या चर्चेतून तटकरे बाजूला, नंतर आमदारांना वळवण्याचा प्रयत्न? शिंदेसेनेच्या आमदाराचा धक्कादायक दावा

अजितदादांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय आहे का? सुनील तटकरे यांच्या भूमिकेची चौकशी करावी अशी मागणी शिंदे सेनेच्या आमदाराने केली आहे.

आधी विलीनीकरणाच्या चर्चेतून तटकरे बाजूला, नंतर आमदारांना वळवण्याचा प्रयत्न? शिंदेसेनेच्या आमदाराचा धक्कादायक दावा
sunil tatkare
| Updated on: Nov 09, 2026 | 10:58 PM
Share

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार का आणि शरद पवार पुन्हा एनडीएला पाठींबा देणार का ? असे वातावरण असताना आता अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूचे प्रकरण पुन्हा उकरुन काढले जात आहे. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींवरून आता नवा वाद पेटला आहे. रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेवर आणि त्यावेळच्या राजकीय हालचालींवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना सुनील तटकरे यांना कुठेही बोलावले जात नव्हते. पवार कुटुंबीय आणि त्यांचे विश्वासू नेते एकत्र बसून चर्चा करत होते, असा दावा आमदार महेंद्र थोरवे यांनी केला.  तसेच अजितदादांचे अपघाती निधन झाल्यानंतर सिटी ईन हॉटेलमध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोपही सुनील तटकरे यांनी केला होता. मात्र हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर तीन दिवसांनी सुनेत्रा पवार यांनी शपथविधी घेतला, असेही त्यांनी नमूद केले.

अजितदादांच्या अपघाती निधनामागे घातपात होता का आणि या प्रकरणात सुनील तटकरे यांची काही भूमिका होती का?, याची निष्पक्ष चौकशी व्हावी असेही आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटले आहे. अजितदादा यांच्या विमान अपघातावरुन होणाऱ्या या आरोपांबाबत कोणताही निष्कर्ष अद्याप सिद्ध झालेला नाही. संबंधित व्यक्तींची अधिकृत भूमिका आणि तपास यंत्रणांची माहिती महत्त्वाची ठरणार आहे.

Follow Us
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!