जग हादरलं… ट्रम्प आत, व्हाइट हाऊसला संशयिताच्या कारची धडक, जवानांवर हल्ला; राष्ट्रपती भवनात लॉकडाऊन
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसजवळ एका कारने सुरक्षा बॅरिकेडला धडक दिल्याने खळबळ उडाली. राष्ट्रपती ट्रम्प आत असताना तात्काळ लॉकडाऊन घोषित करण्यात आले. सीक्रेट सर्व्हिसने तातडीने चालकाला ताब्यात घेतले. या घटनेने सुरक्षा व्यवस्था सक्रिय झाली असून, चालकाचा हेतू आणि दुर्घटनेचे कारण तपासले जात आहे.

जगाला हादरवणारी बातमी आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनाला एका व्यक्तीने आपल्या कारने धडक दिली आहे. त्यानंतर त्याने सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकारी आणि नॅशनल गार्डच्या जवानांशी हाणामारी केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सर्वत्र धावपळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने व्हाइट हाऊसमध्ये काही काळासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. ही घटना घडली तेव्हा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसच्या आतच होते.
या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओ फुटेजनुसार, एक सिल्व्हर सेडान कार लाफ्रायेट स्क्वॉयरच्या उत्तरेकडे बनलेल्या रस्त्यावर आली. एका साइनपोस्टला तिने धडक दिली. या धडकेनंतर गाडीतून सफेद धूर निघताना दिसत आहे. त्यामुळे या परिसरात एकच धावपळ उडाली आणि खळबळ माजली.
सकाळी सकाळीच दुर्घटना
स्थानिक वेळेनुसार सकाळच्या 10 वाजता अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिसने व्हाइट हाऊस प्रेस कोरच्या सदस्यांना आत येण्यासचे आणि तिथेच थांबण्याचे निर्देश दिले. ही घटना घडली तेव्हा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे व्हाइट हाऊसमध्येच होते.
ड्रायव्हर ताब्यात
यावेळी या गाडीतील ड्रायव्हरने सुरक्षा रक्षकांसोबत हाणामारी केली. त्यानंतर ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, ड्रायव्हरची ओळख पडलेली नाही. दुर्घटनेचं कारणही समजू शकलं नाही. तसेच या मागचा हेतूही समजला नाही. हा हल्लेखोर आहे की चुकून ही दुर्घटना घडली याची काहीच माहिती मिळाली नसून सीक्रेट सर्व्हिसचे अधिकारी याचा तपास करत आहे. अमेरिकन एनज्सी या व्यक्तीची कसून चौकशी करत आहे.
बंदोबस्त वाढवला
लाफायेट स्क्वॉयर व्हाइट हाऊसच्या समोरच पेन्सिलवेनिया एव्हेन्यूच्या जवळ आहे. राष्ट्रपती परिसराच्या जवळ एक प्रमुख प्लेस आहे. या ठिकाणी कारने धडक दिल्याने सुरक्षा व्यवस्था सक्रिय झाली आहे. व्हाइट हाऊसच्या परिसरात येण्या जाण्यास मज्जाव करण्यात आला असून सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
