AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीच्या रात्री भारतातील या शहरात एकही फटाका फुटला नाही, AQI अवघा 56, कोणते शहर?

Viral Video:कॅलेब फ्रायसेनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो निळ्या आकाशाखाली, पांढऱ्या ढगांमध्ये 'थम्स-अप' करताना दिसत आहे.

दिवाळीच्या रात्री भारतातील या शहरात एकही फटाका फुटला नाही, AQI अवघा 56, कोणते शहर?
Aizawl - Mizoram
| Updated on: Nov 09, 2026 | 10:19 PM
Share

दिवाळीच्या फटाक्यांनी हवा प्रदुषित झाली असताना देशातील अनेक महानगरातील प्रदुषण प्रचंड वाढले आहे. मात्र,पूर्वोत्तर भारतातील मिझोरम राज्याची राजधानी आयझोल( Aizawl) येथून एक अशी बातमी आली आहे,ज्याने सर्व देशाचे लक्ष वेधले आहे. भारतात गेल्या एक दशकापासून राहत असलेले कॅनेडीयन नागरिक कॅलेब फ्रीसेन यांनी आयझोलच्या निळ्या आकाशाचा फोटो शेअर करुन तेथील हवा दिवाळीतही किती स्वच्छ आहे, याचा दाखला देत सोशल मीडियात हंगामा केला आहे.

जेथे एकीकडे राजधानी दिल्लीतला एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) रेकॉर्ड तोड १,३०० च्या पार गेला आहे. तर आयझोलमध्ये दिवाळीनंतर AQI केवळ ५६ नोंदवला गेला आहे.

रात्रभर एकही फटाका फुटला नाही, फुप्फुसांना आराम

कॅलेब फ्रीसेन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात जे निळ्याशार आकाशाखाली आणि पांढऱ्या ढगांमध्ये थम्ब्स-अप करताना दिसत आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये आयझोलचा साधेपणा आणि पर्यावरणाबद्दल लोकांची असलेली जागरुकतेची प्रशंसा केली आहे.

कॅलेब लिहिलंय की दिवाळीची रात्री आयझोलमध्ये एकाही फटाक्याचा वा आतिबाजीचा आवाज ऐकायला मिळाला नाही. त्यांनी आनंदीत होते म्हटले की त्यांची पत्नी आणि दोन लहान मुले आणि त्यांचा पाळीव कुत्रा रात्रभर कोणत्याही आवाजाविना शांतपणे झोपले आणि त्यांच्या फुप्फुसात ही स्वच्छ ताजी हवा गेल्याने ते आनंदीत आहेत.

दिल्लीत AQI 1,331, आयझोलमध्ये उलट चित्र

ही पोस्ट अशा वेळी आली आहे जेव्हा देशाच्या अनेक महानगरात दिवाळी प्रदुषणाने हवेचा स्तर एकदम खतरनाक श्रेणीत पोहचला आहे. डेटानुसार , दिल्लीमध्ये दिवाळीच्या रात्री फटाक्यांमुळे AQI 1,331 च्या धोकादायक आकड्यांवर पोहचला आणि दुसऱ्या दिवशी श्वास घेण्यासही अडचण येत होती. तसेच दुसरीकडे आयझोल येथे एक्युआय केवळ 56 होता. त्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न आणि शांत होते. तेथील नागरिक पर्यावरण आणि शांततेला किती महत्व देत होते.

येथे पोस्ट वाचा –

कॅलेब फ्रीसेन गेल्या दहा वर्षांपासून भारतात फिरत आहेत. येथील शहरी पायाभूत सुविधेबाबत ते आपली बिनधास्त मते मांडत असतात. या आधी त्यांनी बंगळुरु येतील इंदिरानगर या पॉश भागातील खराब फुटपाथचा एक व्हिडीओ बनवून शेअर केला होता. ज्यात त्यांनी सांगितले की छोट्या मुलांच्या सोबत पायी चालणे किती अवघड बनले आहे.

आता त्यांची आयझोल वाली दिवाळी पोस्ट सोशल मीडियावर चांगली व्हायरल झाली आहे. आणि लोक यास प्रदुषणाशी लढणाऱ्या शहरांसाठी एक मोठा संदेश मानत आहेत.

Follow Us
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!