AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali Safety Tips: दिवाळीच्या आनंदात सुरक्षिततेची काळजीही महत्त्वाची! फटाके फोडण्यापासून दिवे लावण्यापर्यंत लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Diwali Tips : दिवाळीचा आनंद साजरा करताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका. फटाके फोडताना, दिवे लावताना या महत्त्वाच्या टिप्स नक्की पाळा. दिवाळी साजरी करताना या सेफ्टी टिप्स लक्षात ठेवा.

Diwali Safety Tips: दिवाळीच्या आनंदात सुरक्षिततेची काळजीही महत्त्वाची! फटाके फोडण्यापासून दिवे लावण्यापर्यंत लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
| Edited By: | Updated on: Nov 09, 2026 | 9:54 PM
Share

दिवाळी म्हटलं की घराची सजावट, दिव्यांची रोषणाई, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी आलीच. मात्र, या सगळ्या उत्साहात अनेकदा सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होते. विशेषतः घरात लहान मुले असतील तर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. फटाके, दिवे किंवा स्वयंपाकघरातील गरम तेल यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवाळीचा आनंद सुरक्षितपणे साजरा करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा. दिवाळी साजरी करताना या सेफ्टी टिप्स नक्की पाळा.

मुलांना एकटे फटाके फोडू देऊ नका लहान मुलांनी मोठ्यांच्या देखरेखीखालीच फटाके फोडावेत. फटाके पेटवताना त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाके हातात धरून पेटवणे किंवा इतरांच्या दिशेने फेकणे टाळावे.

मोकळ्या जागेतच फटाके फोडा घराच्या गॅलरीत, बाल्कनीत किंवा अरुंद रस्त्यावर फटाके फोडू नयेत. मोकळ्या जागेची निवड करा. फटाक्यांच्या आसपास पडदे, कागद किंवा ज्वलनशील वस्तू नसतील याची खात्री करा. न पेटलेला फटाका पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नका. कपड्यांची निवड काळजीपूर्वक करा फटाके फोडताना सैल किंवा सिंथेटिक कपडे घालणे टाळा. सुती आणि शरीराला व्यवस्थित बसणारे कपडे वापरा. पायात चप्पल किंवा बूट घालावे. पाणी आणि वाळू जवळ ठेवा फटाके फोडताना जवळ पाण्याची बादली आणि वाळू ठेवावी. फटाका पेटवल्यानंतर लगेच सुरक्षित अंतरावर जावे. वापरून झालेले किंवा न पेटलेले फटाके पूर्णपणे विझल्याशिवाय हाताळू नयेत. दिवे आणि विद्युत रोषणाई लावताना काळजी घ्या दिवे आणि मेणबत्त्या पडदे, कागद किंवा इतर ज्वलनशील वस्तूंपासून दूर ठेवा. विद्युत रोषणाईसाठी खराब तारा वापरू नये. एकाच सॉकेटवर अनेक उपकरणांचा अतिरिक्त भार टाकणे टाळा.

फटाके सुरक्षित ठिकाणी ठेवा फटाके उष्णता, गॅस आणि दिव्यांपासून दूर ठेवा. ते लहान मुलांच्या हाताला लागणार नाहीत अशा सुरक्षित ठिकाणी ठेवा. अधिकृत विक्रेत्यांकडूनच फटाके खरेदी करा. भाजल्यास त्वरित काळजी घ्या फटाके किंवा दिव्यांमुळे त्वचा भाजल्यास तो भाग थंड वाहत्या पाण्याखाली धरा. भाजलेल्या जागेवर टूथपेस्ट, तेल किंवा तूप लावू नये. गंभीर दुखापत झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठेवा फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे पाळीव प्राणी घाबरू शकतात. त्यामुळे फटाके फोडताना त्यांना घरातील सुरक्षित आणि शांत खोलीत ठेवा. त्यांना फटाक्यांच्या आसपास नेणे टाळा.

Follow Us
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!