‘हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…’ आमदार संतोष बांगर यांची पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी, ऑडियो क्लिप व्हायरल
MLA Santosh Bangar : मराठवाड्यात पावसाची रझाकारी दिसली. हवामान विभागाने येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यात आता आमदार संतोष बांगर यांनी शेतकऱ्यांसाठी एल्गार केला आहे. त्यांनी पीक विमा अधिकाऱ्याला धारेवर धरले आहे.

मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीचा मोठा फटका मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे. मराठवाड्यात पावसाची रझाकारी दिसली. हवामान विभागाने येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यात आता आमदार संतोष बांगर यांनी शेतकऱ्यांसाठी एल्गार केला आहे. त्यांनी पीक विमा अधिकाऱ्याला धारेवर धरले आहे. निकषाचे कारण पुढे करत आता प्रशासनाने शेतकऱ्यांवर अन्याय करू नयेत असा सज्जड दम बांगर यांनी भरला.
हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…
हात पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांच हित पहा. नाहीतर पीक विमाकंपनीचे जिथे जिथे ऑफिस आहेत ते चुरा करू, असा इशारा शिंदे शिवसेनेचे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी दिला. त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. पीक विम्या संदर्भात काही कमी जास्त झाले तर संतोष बागर ऐवढा वाईट माणूस नाही. पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी आणि आमदार बांगर यांच्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिप ची tv9 मराठी पुष्टी करत नाही. 15 ऑगस्ट च्या अगोदर पीक कंपनी प्रोग्राम मध्ये डोगराळ भागातले गावे निडवल्याने आमदार बांगर आक्रमक दिसले.
संकटात सापडलेल्या लोकांना मदत करणार
नैसर्गिक संकटाच्या काळात शिंदे सेना मराठवाड्यात धावून आली. पण अन्नधान्याच्या किटवर नेत्यांचे स्टीकर असल्याने धाराशिव जिल्ह्यातील काही गावातून ही मदत नाकारण्यात आली होती. त्यातून धडा घेत आमदार संजय बांगर यांनी त्यांच्या परिसरात मदत करताना अन्नधान्य किटवरील नेत्यांचे फोटो काढले. कुठल्याही प्रकारचा प्रचार किंवा स्टिकर लावून जाहिरातबाजी न करता त्यांनी अन्नधान्याचे किट वाटप केले. त्याचे लोकांनी कौतुक केले. समाजकारण आलं की राजकारण आलचं असे सांगत बागंर यांनी एकनाथ शिंदे यांच्या फोटोचे स्टिकर असलेल्या किट वाटपाचे समर्थन केले. एकनाथ शिंदे हे कायम जनतेच्या मदतीला धावून जातात हे राज्याला माहिती असल्याचे ते म्हणाले. तर निकषाच्या आडून अधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करत असतील तर ते सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
