AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातले पहिले हळद संशोधन केंद्र ‘वसमत’ येथे, मुख्यमंत्र्यांनी केला 800 कोटींचा निधी मंजूर

यावेळी पणन मंत्री अब्दुल सत्तार, मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार हेमंत पाटील, कृषी विभागाच्या सचिव व्ही. राधा, भाभा अणूसंशोधन केंद्राचे प्रदीप मुखर्जी, केंद्रीय स्पाईस बोर्डच्या महाराष्ट्र प्रमुख ममता रुपेलिया आदी मानवर यावेळी उपस्थित होते.

देशातले पहिले हळद संशोधन केंद्र 'वसमत' येथे, मुख्यमंत्र्यांनी केला 800 कोटींचा निधी मंजूर
first Turmeric Research Center hingoli wasmat
| Updated on: Jul 24, 2024 | 6:23 PM
Share

मुंबई : देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहन दिले पाहीजे. त्यासाठी हळद लागवडीचे ‘क्लस्टर’ पद्धतीन उत्पादन करण्यात यावे असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. देशातले पहिले हळद संशोधन केंद्र ‘वसमत’ येथे होत आहे, हळद उत्पादनामुळे मराठवाडा, विदर्भ सारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

हळद संशोधन केंद्राबाबत  सह्याद्री अतिथी गृहात बुधवारी आढावा बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वसमतच्या हळदीला जीआय मानांकन मिळाल्याबद्दल अधिकारी आणि संशोधकांचे सुरुवातीला अभिनंदन केले. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे एकीकृत हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र तयार होत आहे. या केंद्रासाठी 800 कोटी रुपयांचा निधी आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तीन वर्षांमध्ये हा प्रकल्प तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्‍यांनी यावेळी दिले.

हळद लागवडीसाठी प्रोत्साहन द्या

हळदीचा वापर दैनंदिन जीवनात जेवणात रंग आणि चव येण्यासाठी हळद वापरली जाते. तसेच हळद जंतूनाशक असल्याने औषध निर्मीतीसाठी देखील वापरली जात असते. त्यामुळे हळदीला देश आणि जगभरातून मोठी मागणी आहे. हळदीच्या पिकास किड कमी प्रमाणात लागते, पाणी जास्त लागत नाही. नैसर्गिक आपत्तीस तोंड देणारे हे नगदी पिक असून त्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. शासकीय अभिसरण योजनांचा लाभ या केंद्रास देण्याचे आदेशही त्यांनी दिले.

जागतिक दर्जाचा देशातील हा एकमेव प्रकल्प

वसमत संशोधन केंद्रामध्ये शेतकऱ्यांना गुणवत्ता असलेले उती संवंर्धीत (टिश्यू क्लचर) रोपांसाठी प्रयोगशाळा, हळद प्रक्रीया केंद्र, विकीरण केंद्र करण्यात येत आहे. देशभरात 50 लाख टन हळदीचा वापर होतो त्यापैकी निम्म्या हळदीचे उत्पादन महाराष्ट्रात होते. जागतिक दर्जाचा देशातील हा एकमेव प्रकल्प आहे. या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांची हळद निर्यात केली जाणार आहे, त्याच बरोबर बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मोठी मदत होईल असे हळद केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सांगितले.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!