Video: शिवाजी राजाही ओबीसी होता, महादेव जानकरांचं गंगाखेडमध्ये वक्तव्य, 30-35 आमदार देण्याचही आवाहन

| Updated on: Dec 21, 2021 | 7:33 AM

त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या महत्वाच्या अशा ओबीसी आरक्षणाचाही समावेश आहे. आज होत असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय होतायत. त्याच पार्श्वभूमीवर महादेव जानकर बोलत होते.

Video: शिवाजी राजाही ओबीसी होता, महादेव जानकरांचं गंगाखेडमध्ये वक्तव्य, 30-35 आमदार देण्याचही आवाहन
शिवाजी राजा हा ओबीसी होता-महादेव जानकर
Follow us on

राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी शिवाजी राजाही ओबीसी होता असं आश्चर्यचकीत करणारं वक्तव्य केलंय. ते परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. त्याच व्यासपीठावर रासपचे आमदार रत्नाकर गुट्टेही होते. मराठा, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जानकरांनी हे वक्तव्य केलंय. जानकर एवढ्यावरच थांबले नाहीत तर, मराठे, मुसलमान, ओबीसी सगळ्यांना आरक्षण देतो असही म्हणाले. त्यासाठी त्यांनी आमदार निवडूण देण्याचं आवाहन केलं.

नेमकं काय म्हणाले जानकर?
ओबीसी एल्गार कार्यक्रमात बोलत असताना महादेव जानकर म्हणाले, ‘आमचं होऊ द्या 30-35 आमदार, 10 मिनिटात ओबीसीची गंमत करुन टाकतो. मराठ्यांना पण आरक्षण देऊ शकतो अन् मुसलमानांनाही आरक्षण देतो. मुसलमानावर तर किती अन्याय आहे? गॅरज बघितलं का मुसलमान, आंब्याचं दुकान बघितलं का मुसलमान, कोंबडीचं दुकान बघितलं की मुसलमान, त्याचा कुठं कलेक्टर नाय, काय नाय, बोंबा बोंब, टोपी घालून केळं विकतंय, फळं विकतंय, अन् त्या मुसलमानाला लोक शिवा देतेत, हिंदू विरुद्ध मुसलमान, हिंदू बी भिकारी अन् मुसलमान बी भिकारी, अन राज्य चालवणारा तिसराच असतो. मराठा समाजाला माझा विनंतीय, शाहू महाराजांनी ह्या देशात आरक्षण दिलं. मराठ्यांना आरक्षण दिलं, पण नंतर आरक्षण का गेलं? शिवाजी राजा देखील ओबीसी होता. कुळवाडी भूषण राजा होता. आमच्यातल्या तथाकथित लोकांना वाटलं, आम्ही लय मोठं हाय गावचं, आम्हाला नको तसलं रिजर्वेशन. आणि आज अवस्था काय झालंय?’

कोणत्या पार्श्वभूमीवर जानकर बोलत होते?
गेल्या काही काळापासून तीन आरक्षणांनी महाराष्ट्र ढवळून निघालाय. त्यात मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, आणि ओबीसी आरक्षणाचा समावेश आहे. राज्य सरकारनं मराठा आरक्षण दिलं पण नंतर ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं मोडीत निघालं. त्यानंतर मुस्लिम आरक्षणाचीही जोरदार मागणी केली गेली. पण धर्माच्या नावावर आरक्षण देता येत नसल्याचा युक्तीवाद झाला. तेही बारगळलं. त्यानंतर गेल्या वर्षाभरात सुप्रीम कोर्टाच्या विविध निर्णयानं राज्यातलं ओबीसी आरक्षणही स्थगित झालंय. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या महत्वाच्या अशा ओबीसी आरक्षणाचाही समावेश आहे. आज होत असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय होतायत. त्याच पार्श्वभूमीवर महादेव जानकर बोलत होते.

हे सुद्धा वाचा:

नाशकात 22 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या, बाभळीच्या झुडपात मृतदेह

Nagar Panchayat Election: औरंगाबादेत सोयगाव नगरपंचायतीसाठी आज मतदान, 3 जागी पोटनिवडणूक व 13 ग्रामपंचायतींचेही भविष्य ठरणार

टाइमपास,टाइमपास २, यलो पर्यंत दर्जेदार चित्रपट देणाऱ्या रोहन गोडांबे यांचा स्वप्नवत प्रवास