घटस्फोटित महिलेची उज्जैनला विक्री, रोजगारासाठी नेले नि 50 हजारांत विकले

| Updated on: Oct 20, 2022 | 4:12 PM

पीडित महिलेने बल्लारपुरात आपल्या भावाशी कसाबसा संपर्क केला.

घटस्फोटित महिलेची उज्जैनला विक्री, रोजगारासाठी नेले नि 50 हजारांत विकले
घटस्फोटित महिलेची उज्जैनला विक्री
Image Credit source: tv 9
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील बल्लारपूर (Ballarpur) येथील घटस्फोटित महिलेला उज्जैन (Ujjain) येथे विकल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. उज्जैन येथे नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने या टोळीने घटस्फोटित महिलेला आपल्यासोबत उज्जैन येथे नेले होते. तिथे गेल्यावर ‘सध्या भरती नाही’ असे सांगत एका युवकाशी 50 हजार रुपयात लग्न लावून देण्यात आले. महिलेने विरोध केल्यानंतर तिला उज्जैन येथे एका घरात डांबून ठेवण्यात आले.

पीडित महिलेने बल्लारपुरात आपल्या भावाशी कसाबसा संपर्क केला. भावाच्या तक्रारीनंतर बल्लारपूर पोलिसांनी आरोपीचा माग काढत उज्जैन गाठले. तपासात चंद्रपूर-विसापूर व बल्लारपूर परिसरात महिला व मुली विकणारी टोळीच ताब्यात आली.

उज्जैन येथून आशाबाई वाघमारे आणि स्वप्ना पेंदोर अशा दोन महिला व घटस्फोटित महिलेची लग्न करणारा मदन राठी नामक युवक अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चंद्रपूर जिल्ह्यातील इतर काही भागात अशाच प्रकारे मुली विक्रीच्या घटनांशी या टोळीचा संबंध आहे काय याबाबत पोलीस तपास करत आहेत. अशी माहिती बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी दिली.

ग्रामीण भागातल्या गरीब महिलांना अशा प्रकरणात शिकार बनविलं जातं. तिला रोजगाराचं आमिष दाखविलं जातं. कामासाठी संबंधित महिला जाण्यास तयार होते. तिथं गेल्यानंतर आता सध्या रोजगार नाही. मग, राहण्याची सोय कुठतरी करावं लागेल, असं सांगितलं जातं.

त्या भागात महिलांचं प्रमाण कमी आहे. म्हणून लोकं महिलेसाठी 50 हजार ते एक लाख रुपये हुंडा देण्यास तयार असतात.