नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास टाळलं, महिला नगरसेवकांनी अंत्यसंस्कार करत जपलं समाजभान

पीपीई किट घालून या तीनही रणरागिणींनी कोरोनाने आयुष्ययात्रा संपलेल्या मृतदेहाला अग्नी दिला. Corporator done funeral corona patient

नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास टाळलं, महिला नगरसेवकांनी अंत्यसंस्कार करत जपलं समाजभान
नगरसेविकांकडून कोरोनाबाधिताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 4:57 PM

सांगली: कोरोनामुळे मृत्यू झाला आणि नातेवाईकांनी अंत्यसंस्कारसाठी पाठ फिरवली. सामाजिक भान म्हणून अशा मृतदेहांना अग्नी देण्याचे धाडस सांगली महापालिकेच्या नगरसेविका सविता मदने, गीतांजली ढोपे-पाटील आणि कल्पना कोळेकर यांनी दाखवले. पीपीई किट घालून या तीनही रणरागिणींनी कोरोनाने आयुष्ययात्रा संपलेल्या मृतदेहाला अग्नी दिला. या तिन्ही महिला नागरसेविकाचे सर्वत्र कौतूक होत आहे. (Sangli Municipal Corporation Three Corporator done funeral of corona patient in Miraj)

मिरजमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

नगरसेविका मिरजेतील स्मशानभूमीची पाहणी करायला गेले आणि स्मशानभूमितील वातावरण पाहून त्याही अस्वस्थ झाल्या नगरसेविका सविता मदने यांनी सिव्हीलमधील एक कोरोनाने गेलेला रुग्ण स्मशामनभूमी मध्ये आले होते. पण रुग्णाचे नातेवाईक आले नाहीत. मदने यांच्या सोबत गीतांजली ढोपे-पाटील, कल्पना कोळेकर याही गेल्या.

नगरसेविकांनी मृतदेहाला दिला अग्नी

दुसरीकडे स्मशानात यांना अखेरच्या क्षणी निरोप देणारे नातेवाईक कुणीच नव्हते. अशा वेळी या तीनही नगरसेविकांनी पीपीई किट घालून मृतदेहांना अग्नी दिला. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवताना एका महामारीचा बळी ठरलेल्या नातेवाईकांपासून दुरावलेल्या मृतदेहाला अग्नी देताना मन सुन्न झाले होते.

Sangli Corporators did Funeral of corona Patient Miraj

सविता मदने, गीतांजली ढोपे-पाटील आणि कल्पना कोळेकर

कोरोनामुळे जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांचे निधन

कोरोनामुळे सांगली जिल्ह्यातील जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांचे निधन झाले आहे. जत पोलीस ठाण्यात ते ऑक्टोंबर मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक झाली होती. आठ दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी दाखल झाले होते. तर त्यांचा भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे. ते मूळचे अकोलाचे रहिवासी आहेत. त्यांना आई, वडील, पत्नी व दोन मुले आहेत.

सांगलीत 2879 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू

सांगली जिल्ह्यात शनिवारी 1601 कोरोना रुग्ण आढळले. तर, कोरोनामुळे 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 2879 वर पोहोचला आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची रुग्ण संख्या 16985 वर गेली आहे. तर उपचार घेणारे 1573 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 79442 वर गेली आहे. जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 99303 झाली आहे.

संबंधित बातम्या:

‘मिशन लसीकरण’; राज्यात कोरोना लसीकरणाच्या कामाला वेग; चांद्यापासून बांद्यापर्यंत जय्यत तयारी!

Shikha Malhotra | कोरोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या अभिनेत्रीला अर्धांगवायू, रुग्णालयात दाखल!

(Sangli Municipal Corporation Three Corporator done funeral of corona patient in Miraj)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.