सुरक्षा काढली; पण, धोका झाल्यास जबाबदारी शिंदे-फडणवीस यांची, अमोल मिटकरी यांचा इशारा

| Updated on: Oct 29, 2022 | 10:38 PM

आमच्या जिवीताला काही झालं तर याची जबाबदारी शिंदे-फडणवीस सरकारची असेल.

सुरक्षा काढली; पण, धोका झाल्यास जबाबदारी शिंदे-फडणवीस यांची, अमोल मिटकरी यांचा इशारा
अमोल मिटकरी
Image Credit source: tv 9
Follow us on

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची X कॅटेगिरीची सुरक्षा काढण्यात आली. नागपूर विभागाकडून त्यांना सुरक्षा देण्यात आली होती. आज दुपारी मिटकरी यांना फोनद्वारे सुरक्षा काढल्याचं सांगण्यात आलं. ATS ने नागपूर विभागाला फोनवर सुरक्षा काढण्याचे आदेश दिले. काही महिन्यांपूर्वी मिटकरी यांना ही एक्स कॅटेगिरीची सुरक्षा देण्यात आली होती. फडणवीस आणि शिंदे सरकार सत्तेत आलं आणि त्यांनी सर्वांची सुरक्षा कपात केली आहे.

पण आम्हाला सुरक्षेची काही गरज वाटत नाही. सत्तेतील नेत्यांना सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आमची सुरक्षा का काढली, हा आमचा सरकारला प्रश्न आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले. जर आमच्या जीवाला जर काही झाल्यास याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकार जबाबदार राहणार असल्याचंही मिटकरी म्हणाले.

राज्य सरकारनं सुरक्षेसंदर्भात निर्णय घेतला. त्यानुसार काही जणांची सुरक्षा वाढविण्यात आली. तर काही जणांच्या सुरक्षेत कपात करण्यात आलं. त्यात अमोल मिटकरी यांची सुरक्षा काढण्यात आली आहे.

अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. ते नेहमी सरकारच्या विरोधात बोलत असतात. तसेच टीका करत असतात. त्यांची काही वक्यत्व ही वादग्रस्त असतात. त्यामुळं त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती. पण, नव्या सरकारनं सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला.

मोठं-मोठ्या मंत्र्यांची सुरक्षा काढली आहे. विजय वडेट्टीवार यांची सुरक्षा काढण्यात आली. रवी राणा यांची सुरक्षा व्यवस्था का वाढण्यात आली. आमच्या जिवीताला काही झालं तर याला जबाबदारी शिंदे-फडणवीस सरकारची असेल, असंही अमोल मिटकरी म्हणाले.