चिंचणी गावानं करुन दाखवलं, कोरोनाला वेशीवर रोखलं, आता सौरऊर्जेवरील सार्वजनिक पाणी पुरवठ्याची योजना सुरु

आषाढी वारीच्या मार्गावरील पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावानं विकासाच्या बाबतीत पुढचं पाऊल टाकलं आहे. पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावानं मिनी महाबळेश्वर असा नावलौकिक निर्माण केला आहे. Chinchni Village

चिंचणी गावानं करुन दाखवलं, कोरोनाला वेशीवर रोखलं, आता सौरऊर्जेवरील सार्वजनिक पाणी पुरवठ्याची योजना सुरु
चिंचणी

सोलापूर: आषाढी वारीच्या मार्गावरील पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावानं विकासाच्या बाबतीत पुढचं पाऊल टाकलं आहे. पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावानं मिनी महाबळेश्वर असा नावलौकिक निर्माण केला आहे. चिंचणी गावानं कोरोनाला वेशीवरच रोखण्यातचं यश मिळवलं आहे. पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावात सार्वजनिक पाणीपुरवठा संपूर्णपणे सौरऊर्जेद्वारे निर्माण होणाऱ्या विजेचा वापर करुन करण्यात येत आहे. नुकतेच या प्रकल्पाचे उद्घाटन सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि प्रिसिजन उद्योग समुहाच्या डॉ. सुहासिनी शहा यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. (Solapur Pandharpur Chinchni Village role model to other villages started water supply on solar energy project )

प्रिसिजन उद्योग समुहाचं पाठबळ

चिंचणी गावातील विकासाला प्रिसिजन उद्योग समूहाच्या आर्थिक पाठबळ दिलं आहे. गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना सौरउर्जेवर राबवण्यासाठी प्रिसिजन उद्योग समुहानं आर्थिक पाठबळ दिलं आहे.

चिंचणी गावचा प्रकल्प महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल

पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावात राबवण्यात आलेला सार्वजनिक पाणी पुरवठ्याचा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल ठरणार आहे. प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा आणि सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या हस्ते सौरऊर्जा संचाच लोकार्पण करण्यात आला आहे.

Chinchni Village

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते प्रकल्पाचं उद्घाटन

कण्हेर धरणात गाव बुडाल्यानं पूनर्वसन

सातारा जिल्ह्यातील वेण्णा नदीवर कण्हेर धरणाची निर्मिती होत असताना पायथ्याशी असणाऱ्या चिंचणी हे गाव विस्थापित झाले. 1982 या गावाचे पुनर्वसन सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात करण्यात आलं आहे. पंढरपूरला रस्त्यालगत एका छोट्याशा टेकडीवर हे गाव वसले आहे.

चिंचणीकरांनी शासनानं दिलेल्या जागेतच हिरवळ फुलवण्याचा चंग बांधला आहे. तब्बल दहा हजारांपेक्षा अधिक झाडं लावत व ती उत्तम प्रकारे जोपासत चिंचणी गावानं मिनी महाबळेश्वर अशी ओळख निर्माण केली आहे. अत्यंत स्वच्छ ,शांत, निसर्गरम्य अशा चिंचणीची दखल नुकतीच भारत सरकारच्या ग्रामविकास खात्याने घेत गावाचा सन्मान घेतला होता. चिंचणी गावानं झाडांचं गाव अशी देखील ओळख निर्माण केली आहे.

संबंधित बातम्या:

मराठवाडा दुष्काळाच्या छायेत, लाखो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

Breaking | रिफायनरी ठरावाला समर्थन केल्यानं नगरसेविका प्रतीक्षा खडपेंवर कारवाई

(Solapur Pandharpur Chinchni Village role model to other villages started water supply on solar energy project )

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI