AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावतीमध्ये डेंग्यूचे थैमान, जिल्ह्यात 500 पेक्षा अधिक रुग्ण

जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 437 संशयित व्यक्ती आढळल्या असून सध्या 79 डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरु आहे.

अमरावतीमध्ये डेंग्यूचे थैमान, जिल्ह्यात 500 पेक्षा अधिक रुग्ण
AMRAVATI DENGUE
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 10:47 PM
Share

अमरावती : अमरावती जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. मात्र आता येथे अनेक जण तापाने फणफणले असून ग्रामीण रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात तूफान गर्दी पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले आहेत.  आतापर्यंत येथे 437 संशयित व्यक्ती आढळल्या असून सध्या 79 डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरु आहे. (spreading of dengue disease increased in Amravati total 500 patients found)

जिल्ह्यात डेंग्यूचे 79 रुग्ण आढळले 

सध्या कोरोनाची दुसरी लाट सरली आहे. लाट ओसरल्यामुळे येथी नागरिक थोडे स्थिरावले होते. मात्र, त्यातच अमरावती जिल्ह्यात डेंग्यूने डोके वर काढले आहे. येथे डेंग्यूचे एकूण 79 रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच जिल्ह्यात सध्या 437 जण संशयित आहेत. येथे डोग्यूच नव्हे तर मलेरियानेसुद्धा डोके वर काढले आहे. येथे मलेरियाचे 9 रुग्ण आढळले आहेत.

प्रशासनाच्या वतीने धूर फवारणी सुरू

वरील आकडेवारी ही प्रशासकीय आकडेवारी असून खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचे 500 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती आहे. ग्रामीण भागातील तिवसा तालुक्यात महिनाभरात तिघांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील तिवसा तालुक्यातील डेंग्यूचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने येथे धूर फवारणी सुरू आहे. तसेच ग्रामीण भागात तपासणीला सुद्धा वेग आला आहे.

कोठेही पाणी न साचू देण्याचं अवाहन

दरम्यान, आगामी काळात नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं असल्याचं सांगितलं जातंय. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावात दवंडी देऊन घराच्या परिसरात स्वच्छता राखण्याचं तसेच वाढलेले गवत कापण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच कोठेही पाणी न साचू देण्याचं अवाहनदेखील केलं जात आहे.

इतर बातम्या :

आमदार निलेश लंकेंनी अरेरावी, शिवीगाळ, मारहाण केली नाही; ‘त्या’ लिपिकाचा खुलासा! नेमंक प्रकरण काय?

‘ईडब्ल्यूएस’साठी घटनात्मक तरतूद शक्य तर मराठा आरक्षणासाठी का नाही?, अशोक चव्हाण यांचं फडणवीसांना प्रतिआव्हान

मोठी बातमी ! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात 40 अतिरिक्त विशेष ट्रेन, रेल्वे विभागाचा निर्णय

(spreading of dengue disease increased in Amravati total 500 patients found)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.