AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी काढले चिमटे; म्हणाले, “जय श्रीराम म्हटलं की…”

अमोल मिटकरी यांनी जय श्रीराम म्हणल्यावर धडकी भरतेय असं म्हटलं. आंदोलनावेळी जय श्रीराम म्हटलं जातं. मग रामाने दहशत शिकवलीय का? रामाने सावत्र भाऊ असलेल्या भरताला नंदीग्रामची गादी दिली.

अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी काढले चिमटे; म्हणाले, जय श्रीराम म्हटलं की...
सुधीर मुनगंटीवार, अमोल मिटकरी
| Edited By: | Updated on: Jan 28, 2023 | 2:57 PM
Share

चंद्रपूर : जय श्रीराम म्हटलं की धडकी भरतेय, असं म्हणत जय श्रीराम म्हणण्याला अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी विरोध करत नव्या वादाला तोंड फोडलंय. यावर मंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी अमोल मिटकरी यांना डिवचलं. जय श्रीराम हा शब्द ऐकल्यावर राक्षस घाबरायचे, असं म्हणत मुनगंटीवार यांनी अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अप्रत्यक्षपणे मुनगंटीवार यांनी मिटकरी यांना राक्षस म्हटलं. राक्षसांच्या कैदेतून माता सीतेला मुक्त करण्यासाठी गेले होते तेव्हा श्रीराम हा शब्द लिहिल्यावर पाण्यावर दगड तरंगू लागले होते. श्रीराम हा शब्द ऐकल्यावर राक्षस घाबरायचे त्यांच्या मनात भीती निर्माण व्हायची,असं मुनगंटीवार म्हणाले.

राम राम हा आदराचा शब्द आहे. मात्र जय श्रीराम म्हटलं की, अमोल मिटकरींनी धडकी भरतेय. असं म्हणत जय श्रीराम म्हणण्याला अमोल मिटकरी यांनी विरोध करत नव्या वादाला तोंड फोडलंय. पुण्यातील राजगुरुनगर येथील साहेबराव बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते.

जय श्रीरामांवर प्रेम असणाऱ्यांनी हे करावं

अमोल मिटकरी यांनी जय श्रीराम म्हणल्यावर धडकी भरतेय असं म्हटलं. आंदोलनावेळी जय श्रीराम म्हटलं जातं. मग रामाने दहशत शिकवलीय का? रामाने सावत्र भाऊ असलेल्या भरताला नंदीग्रामची गादी दिली. मग ज्याचं जय श्रीरामवर प्रेम असेल त्यांनी स्वत:च्या सख्य्या भावाला दोन एकर शेती तरी द्यावी.

दहशत माजविण्याचं काम काही लोकं करतात

रामाने भावाचा आदर केला. मग जय श्रीराम करणाऱ्यांनी याचा विचार करायला हवा. जस वंदे मातरम् ज्या नावाची दहशत तशीच जय श्रीरामच्या नावाची दहशत माजविण्याचे काम या सरकारमधील लोक करत आहेत. असा आरोप करत जय श्रीराम म्हणाऱ्यांना मिटकरी यांनी खडेबोल सुनावले.

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.