सीव्होटरच्या सर्व्हेवर गुलाबराव पाटील स्वतःचच उदाहरण दिलं? आकडेवारी सांगत सर्व्हेवर दिलेली प्रतिक्रिया काय?

जनतेच्या मताची पेटीमध्ये जाण्याची जी हवा असते ती इलेक्शनच्या काही दिवस आधी बनते, असं स्पष्टचं मत गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे.

सीव्होटरच्या सर्व्हेवर गुलाबराव पाटील स्वतःचच उदाहरण दिलं? आकडेवारी सांगत सर्व्हेवर दिलेली प्रतिक्रिया काय?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 12:24 PM

अनिल केऱ्हाळे, टीव्ही 9 मराठी, जळगाव : नुकताच सीव्होटर या सर्व्हे करणाऱ्या संस्थेने महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत काही अंदाज वर्तविले आहे. महाराष्ट्रातील 48 जागांवर महाविकास आघाडी सरकारला तब्बल 34 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर भाजपसह घटक पक्षांना 14 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सीव्होटरच्या सर्व्हे प्रमाणे निकाल लागल्यास भाजपला महाविकास आघाडी वरचढ ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत सीव्होटरवरच शंका उपस्थित केली आहे. यामध्ये त्यांनी स्वतःच्या निवडणुकीचे उदाहरण देत सीव्होटरचे अंदाज फेकू असल्याचे म्हंटले आहे. आयुष्यात मी पण सर्व्हे पाहिले आहेत, जे सर्व्हेत दाखवलं जातं त्याच्या विरुद्ध दिसलेले आहेत, त्यामुळे माझा सर्व्हेवर विश्वास नाही असंही गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे.

जळगावमध्ये माध्यमांशी बोलत असतांना गुलाबराव पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीला दीड आणि विधानसभा निवडणुकीला अजून पावणे दोन वर्षे इतका काळ बाकी आहे.

आयुष्यात मी पण सर्व्हे पाहिले आहेत, जे सर्व्हेत दाखवलं जातं त्याच्या विरुद्ध दिसलेले आहेत, त्यामुळे माझा सर्व्हेवर विश्वास नाही.

हे सुद्धा वाचा

जनतेच्या मताची पेटीमध्ये जाण्याची जी हवा असते ती इलेक्शनच्या काही दिवस आधी बनते, असं स्पष्टचं मत गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे.

मला आठवतं ज्यावेळेस मी निवडणूक हरलो होतो तेव्हा सर्व्हेत मला विजयी दाखवलं होतं तर ज्यावेळेस मी जिंकलो होतो तेव्हा सर्व्हेने प्रतिस्पर्धीला 85 हजार मतं दाखवली होती, त्यामुळे मला सर्व्हेवर विश्वास नाही.

एक अफवा माणसाला जिंकवू आणि हरवू शकते, सीव्होटरने आजचे अंदाज सांगितले आहेत, त्यांचे अंदाज जर पाहिले तर ते फेकू अंदाज आहेत. एकही अंदाज त्यांचा ठिकाणावर नाही.

त्यांचे मागचे अंदाज तंतोतंत मॅच होणारे नाहीत, मला असं वाटतं त्यांनी घरी बसून हा अंदाज केला आहे असा टोला गुलाबराव पाटील यांनी सीव्होटरला लगावला आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.