AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगीरथ भालकेंची भाजपमध्ये जाण्यासाठी तळमळ, प्रशांत परिचारकांचा मोठा दावा, पंढरपूरच्या राजकारणात मोठी खळबळ

पंढरपूर नगराध्यक्ष निवडणुकीच्या धामधुमीत भाजप नेते प्रशांत परिचारक यांनी भगीरथ भालके यांच्याविषयी गौप्यस्फोट केला आहे. भालके यांनी भाजपमधून उमेदवारी मिळवण्यासाठी कसे प्रयत्न केले, याबाबत परिचारकांनी जाहीर सभेत दावा केला.

भगीरथ भालकेंची भाजपमध्ये जाण्यासाठी तळमळ, प्रशांत परिचारकांचा मोठा दावा, पंढरपूरच्या राजकारणात मोठी खळबळ
Bhagirath Bharat Bhalke
| Updated on: Nov 25, 2025 | 8:38 AM
Share

राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबरला लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. एकीकडे राज्यात निवडणुकांचा धुराळा उडत असताना दुसरीकडे पंढरपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. भाजप नेते प्रशांत परिचारक यांनी एका जाहीर सभेत भगीरथ भालके यांच्याविषयी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. भगीरथ भालके हे भाजपमध्ये येऊन उमेदवारी मिळवण्यासाठी कसे धडपडत होते, याचा खळबळजनक दावा परिचारक यांनी केला आहे.

पंढरपूर येथे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शामल शिरसाट यांच्या प्रचारसभेत बोलताना प्रशांत परिचारक यांनी याबद्दल भाष्य केले. भगीरथ भालके यांनी भाजपमधून उमेदवारी मिळावी म्हणून माझी भेट घेण्याचा प्रयत्न केला. ते मला भेटण्यासाठी तब्बल चार तास वाट पाहत थांबले होते. मी त्यांना भेटलो नाही. तेव्हा मी त्यांना भाजपच्या नेत्यांना भेटा असा निरोप दिला. यानंतर भालके यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत मुख्यमंत्र्‍यांची भेट घेतली होती. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुन्हा माझ्याकडेच पाठवून दिले, असे परिचारक यांनी भर सभेत सांगितले.

पंढरपूर नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक

पंढरपूर नगराध्यक्ष निवडणुकीमुळे प्रशांत परिचारक यांच्या गौप्यस्फोटाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पंढरपूर नगराध्यक्ष पदासाठीची प्रामुख्याने भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्यात लढत होत आहे. भाजपकडून शामल शिरसाट या रिंगणात आहेत. तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिती भालके या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे भगीरथ भालके यांनी भाजपमधून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा परिचारक यांनी केला आहे. या चुरशीच्या लढतीच्या पार्श्वभूमीवर अधिक चर्चेचा विषय बनला आहे आणि यामुळे निवडणुकीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

भाषणाची क्लिप व्हारल

प्रणिती भालके या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्यांचे पती भगीरथ भालके हे या भागातील एक प्रमुख राजकीय चेहरा आहेत. त्यामुळे त्यांच्या पतीच्या भाजप प्रवेशाच्या कथित प्रयत्नांवरून हा वाद रंगला आहे. प्रशांत परिचारक यांच्या या खळबळजनक भाषणाची क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे पंढरपूरच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...