AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध रिलस्टार सोनाली जाधवच्या हत्याकांडाचे गुपित उघड, शेवटच्या तासात काय घडलं?

पंढरपूर येथील रिलस्टार सोनाली जाधव हिची प्रियकराकडून गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. अनैतिक संबंधांतील संशयातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून, करकंब पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

प्रसिद्ध रिलस्टार सोनाली जाधवच्या हत्याकांडाचे गुपित उघड, शेवटच्या तासात काय घडलं?
Sonali Jadhav
| Updated on: Apr 17, 2026 | 9:48 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता पंढरपूर तालुक्यातील भोसे गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे. सोशल मीडियावर रिलस्टार म्हणून प्रसिद्ध असलेली ३४ वर्षीय सोनाली नेताजी जाधव हिची हत्या करण्यात आली आहे. अनैतिक प्रेमसंबंधातून तिच्याच प्रियकराने तिची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेमुळे सोशल मीडियासह आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

संपूर्ण प्रकरण काय?

सोनाली जाधव ही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ तयार करून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध झाली होती. काही कौटुंबिक कारणामुळे ती आपल्या पतीपासून वेगळी होऊन माहेरी राहत होती. याच काळात तिची ओळख गावातीलच तुकाराम उर्फ बुवा वामन गावंधरे याच्यासोबत झाली. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि याच मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. मात्र, हे प्रेमसंबंध काही काळाने वादाच्या भोवऱ्यात सापडले. तुकारामला सोनालीच्या चारित्र्यावर संशय होता. तिचे अन्य एका व्यक्तीसोबत बोलणे किंवा फिरणे सुरू असल्याचे त्याला सतत वाटत होते. ज्यामुळे त्यांच्यात वारंवार खटके उडत होते.

यानंतर ६ एप्रिलला तुकारामने सोनालीला वाढदिवसाचे गिफ्ट देण्याचे आमिष दाखवले आणि तिला भेटायला बोलावले. त्याने सोनालीला आपल्या बाईकवर बसवून सोबत नेले. मात्र, हा प्रवास तिच्या आयुष्यातील शेवटचा ठरला. त्याने निर्जन ठिकाणी नेऊन गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिने तिचा मृतदेह रोपळे परिसरातील उजनी कालव्यात फेकून दिला.

पोलिसांनी कसा लावला छडा?

दोन दिवस उलटूनही सोनाली घरी न आल्यामुळे तिच्या वडिलांनी करकंब पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपास आणि काही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तुकारामला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. दरम्यान, कालव्यात एका अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला होता. नातेवाईकांनी कपडे आणि अंगावरील दागिन्यांवरून ओळख पटवली असता, तो मृतदेह सोनालीचाच असल्याचे निष्पन्न झाले.

सोनाली जाधवच्या निधनाने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका रिलस्टारचा अशा प्रकारे झालेला अंत पाहून चाहतेही हळहळ व्यक्त करत आहेत. करकंब पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. तसेच याप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या घटनेने प्रेमसंबंधातील संशयाचे परिणाम किती वाईट होऊ शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...