AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 दिवस, 4 प्रश्न अन्… परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी आरोपींविरुद्ध पोलिसांना सापडला मोठा पुरावा, आता अडचणी वाढणार?

परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदसह चौघांना २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांच्या बँक खात्यांची आणि थार गाडीची चौकशी सुरू आहे.

7 दिवस, 4 प्रश्न अन्... परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी आरोपींविरुद्ध पोलिसांना सापडला मोठा पुरावा, आता अडचणी वाढणार?
Ayan Ahmad
| Updated on: Apr 22, 2026 | 8:57 AM
Share

अमरावतीच्या परतवाडा येथील बहुचर्चित लैंगिक शोषण आणि मुलींचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याच्यासह चार आरोपींना न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत म्हणजेच सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची आणि जप्त केलेल्या साहित्याची कसून चौकशी केली जाणार आहे.

न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपींमध्ये मुख्य आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद, उजैर खान इकबाल खान, मो. साद मो. साबिर आणि तबरेज खान तसलीम खान यांचा समावेश आहे. मुख्य आरोपी अयान अहमद हा सोशल मीडियावर प्रभाव टाकण्यासाठी आणि मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी आलिशान थार गाडी, नोटांचे बंडल आणि रिव्हॉल्व्हर दाखवून रिल्स बनवत असे. हे साहित्य नेमके कोणाचे आहे? त्याने हे सर्व कोठून मिळवले? आणि या कृत्यांमध्ये त्याला कोणाचे राजकीय किंवा बाह्य पाठबळ लाभले आहे का? या दिशेने पोलिसांचा कसून तपास सुरू आहे.

तसेच त्याने गुन्ह्यात वापरलेला आयफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणात केवळ लैंगिक शोषण नसून त्यातून मोठी आर्थिक कमाई केली गेल्याचा संशय पोलिसांना आहे. मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करून आरोपींनी पैसे कमावले आहेत का, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी ८ आरोपींच्या ११ बँक खात्यांचे स्टेटमेंट मिळवले आहे. या खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम आणि व्यवहारांचे स्त्रोत शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

फॉरेन्सिक डेटा ठरणार मुख्य दुवा

आरोपींच्या मोबाईलमधील जो डेटा नष्ट करण्यात आला होता, तो पोलिसांनी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पुन्हा मिळवला (Recover) आहे. फॉरेन्सिक लॅबकडून या डेटाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. आता प्रत्यक्ष आरोपींच्या समोर बसवून या डेटाची उलटतपासणी केली जाणार आहे. यामध्ये पीडित मुलींचे व्हिडीओ, चॅटिंग आणि इतर महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता आहे. तसेच पुढील सात दिवसांच्या कोठडीत या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. तसेच या गुन्ह्याचे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत, याचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...