एकनाथ शिंदे मराठ्यांच्या नजरेतून उतरले…; मनोज जरांगे काय म्हणाले?

| Updated on: Mar 11, 2024 | 3:37 PM

Manoj Jarange Patil on CM Eknath Shinde and Maratha Reservation : मनोज जरांगे सध्या दौरा करत आहेत. आज परभणीत त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मनोज जरांगे काय म्हणाले? वाचा सविस्तर...

एकनाथ शिंदे मराठ्यांच्या नजरेतून उतरले...; मनोज जरांगे काय म्हणाले?
Parbhani Manoj Jarange Patil on CM Eknath Shinde Maratha Reservation Latest Marathi News
Follow us on

संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, परभणी | 11 मार्च 2024 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मागच्या काही दिवसांपासून दौरा करत आहेत. या दौऱ्या दरम्यान स्थानिकांशी संवाद साधत ते आरक्षणाबाबत चर्चा करत आहेत. आज मनोज जरांगे पाटील परभणीत आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे काही वैर नाही. सगेसोयरेसह बाकी मागण्या मान्य करा. त्याची अंमलबजावणी करा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जरांगे काय म्हणाले?

गिरीश महाजन म्हणतो माझे लाड केले… काय लाड केले? कॉफी पाजली का? एकनाथ शिंदे साहेबांचा मराठ्यांनी सहा महिने सन्मान केला. मी म्हणायचो आरक्षण देतील तर एकनाथ शिंदे साहेबच देतील. पण एकनाथ शिंदे मराठ्यांच्या नजरेतून उतरले, असं मनोज जरांगे म्हणाले.

“माझा जीव जरी गेला तरी…”

मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले. 20 वर्षांपूर्वी यांच्याकडे मोटार सायकल नव्हती. तुम्ही राजकारण करा. पण आधी आरक्षण द्या. देवेंद्र फडवणीस किती दिवस दडपशाही करतात ते बघू. आता पाच ते सहा कोटी मराठ्यांनी एकत्र यायचे. जगातील सर्वात मोठी सभा असणारा आहेत. 10 टीम सध्या सभेसाठी जागा शोधत आहे. या सभेला परभणीच्या मराठा समाजाने झाडून पुसून एकत्र यायचे आहेत. उद्यापासून समजणे कामाला लागायचे. माझा जीव जरी गेला तरी मराठा समाजाच्या लेकरांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय मागे हटत नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

“आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही”

चलो मुंबईचे बोर्ड काढत आहेत. माझे फोटो लावतात तुमचे लावत नाहीत मी काय करू? मराठा समाजाबद्दल देवेंद्र फडवणीस यांच्या मनात द्वेष आहे. फडवणीस तुम्ही माझ्यासोबत आठ दिवस उपोषण करा, तुमची ढेरी कमी होईल. तुम्हाला उपोषणाची किंमत कळणार नाही. फडवणीस यांनी उत्तर द्यावे. अंतरवाली मधील महिला मध्ये तुम्हला आई बहीण दिसली नाही का? गृहमंत्री म्हणून वागता आता तुम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही, असं मनोज जरांगे परभणीत म्हणाले.