AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3-4 दिवसात मविआची उमेदवार यादी जाहीर झालीच पाहिजे अन् वंचित…; माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

Sushilkumar Shinde on Mahavikas Aghadi and Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक अन् महाविकास आघाडीचं जागावाटप; राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान... कधी होणार महाविकास आघाडीचं जागावाटप? काँग्रेसच्या बड्या नेत्यानं सांगितलं. वाचा सविस्तर...

3-4 दिवसात मविआची उमेदवार यादी जाहीर झालीच पाहिजे अन् वंचित...; माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
| Updated on: Mar 11, 2024 | 3:15 PM
Share

सागर सुरवसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी | 11 मार्च 2024 : आठवड्याभरात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. अशात महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार का? याबाबतही राज्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर बोलले आहेत. येत्या तीन ते चार दिवसात महाविकास आघाडीची उमेदवार यादी जाहीर झाली पाहिजे असं मला वाटतं. महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या यादीत वंचितही असली पाहिजे, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

वंचितबाबत काय म्हणाले?

महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर येतील. मागील निवडणुकीत त्यांना अनुभवाचे चटके बसले आहे. यातून ते सुधारतील अशी माझी कल्पना आहे. वेगळा असं काही होणार नाही. लोकांनी आता ठरवलं पाहिजे. वंचित बाबत मागच्या निवडणुकीत आलेला अनुभव, नागरिकांनी त्यातून मतदान केलं पाहिजे, असंही शिंदे म्हणाले.

प्रणिती शिंदेंना उमेदवारी?

सोलापूरमधून प्रणिती शिंदे लोकसभा निवडणूक लढतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावरही सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोलापूर काँग्रेस सदस्यांची इच्छा आहे प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळावी. उमेदवारीबाबत हाय कमांड निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. काँग्रेसचा कोणी उमेदवार असेल. त्यासाठी जिल्हा काँग्रेसकडून तयारी केली जात आहे. जिल्हा अध्यक्षांची अडचण असल्यामुळे प्रभारी जिल्हा अध्यक्ष नेमले आहे. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला ज्या ज्या ठिकाणी अडचण आहे. त्या त्या ठिकाणी डागडुजीचे काम सुरू आहे, असं ते म्हणाले.

भाजप कुणाला उमेदवारी देणार?

सोलापूरमधून भाजप कुणााल उमेदवारी देणार? यावरही शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. सोलापुरात भाजपला उमेदवारी मिळत नाही पण भाजप एखादा छुपा रुस्तम उमेदवार काढतील. 2019 साली भाजपने उमेदवार काढला त्याच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नव्हते. ते प्रकरण कोर्टात चालू आहे.मात्र ते उमेदवारी बाबतीत कुणाचं काय काढतील ते सांगता येत नाही, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.