AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला शिकवू नका, छगन भुजबळांनी पार्थ पवारांना सुनावलं? बंद दाराआडच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

अन्नधान्य पुरवठ्याच्या टेंडरवरून मंत्री छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यात मंत्रालयात जोरदार खडाजंगी झाल्याची सविस्तर माहिती समोर येत आहे.

मला शिकवू नका, छगन भुजबळांनी पार्थ पवारांना सुनावलं? बंद दाराआडच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
parth pawar chhagan bhujbal
| Updated on: May 29, 2026 | 8:27 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अंतर्गत धुसफूस आता थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत आणि बैठकांपर्यंत पोहोचली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यात एका शासकीय टेंडरवरून हाय-व्होल्टेज ड्रामा झाल्याची खळबळजनक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. एका विशिष्ट कंत्राटदाराला अन्नधान्य पुरवठ्याचे टेंडर देण्यासाठी दबाव आणल्याचा प्रयत्न या वादाला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादीत ज्येष्ठ विरुद्ध नवी पिढी असा सुप्त संघर्ष पेटल्याचे चित्र आहे.

वादाची नेमकी पार्श्वभूमी काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न आणि नागरी पुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या अन्नधान्य पुरवठ्याच्या टेंडरची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेत एका विशिष्ट व्यक्तीला किंवा संस्थेला हे कंत्राट मिळावे, यासाठी पार्थ पवार आग्रही होते. यासंदर्भात झालेल्या एका बैठकीत पार्थ पवारांनी थेट भुजबळांकडे कंत्राट देण्याबाबत शब्द टाकल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असलेल्या छगन भुजबळांनी याला स्पष्ट नकार दिला.

“प्रशासन कसं चालतं हे मला शिकवू नका!”; भुजबळ संतापले

पार्थ पवारांच्या सततच्या हस्तक्षेपामुळे छगन भुजबळ यांचा संयम सुटला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत उपस्थित असलेल्या छगन भुजबळांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत पार्थ पवारांची चांगलीच कानउघडणी केली. शासकीय नियम आणि टेंडर प्रक्रिया कशी चालते, याचा मला प्रदीर्घ अनुभव आहे. त्यात असा थेट हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही,” अशा कडक शब्दांत सूचना देत छगन भुजबळांनी आपला संताप व्यक्त केला. मंत्र्यांच्या अशा आक्रमक पवित्र्यामुळे बैठकीतील वातावरण कमालीचे तापले आहे.

६ महिन्यांचा हिशोब मागितल्याने वरिष्ठ नेते नाराज

गेल्या ६ महिन्यांपासून पार्थ पवार यांच्याकडून पक्षाच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये आणि शासकीय कामांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हस्तक्षेप केला जात असल्याची तक्रार सातत्याने होत आहे. विशेष म्हणजे, पार्थ पवारांनी थेट मंत्र्यांकडेच गेल्या ६ महिन्यांत मंजूर झालेली टेंडर्स, वाटप झालेला निधी आणि विकासकामांची सविस्तर डेटा मागवला आहे. पक्षाची कोणतीही अधिकृत घटनात्मक जबाबदारी किंवा शासकीय पद नसताना, केवळ दादांचे सुपुत्र म्हणून अशा प्रकारे थेट मंत्र्यांना जाब विचारल्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक ज्येष्ठ नेते कमालीचे नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी सूनेत्रा पवारांपर्यंत पोहोचवल्याचेही बोललं जात आहे.

पक्षाची बोलण्यास टाळाटाळ; विरोधकांच्या हाती कोलीत

या संपूर्ण प्रकरणावर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र पडद्यामागे सुरू असलेल्या या धुसफुशीमुळे आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. ज्यामुळे विरोधकांच्या हाती मोठे कोलीत सापडले आहे.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल