AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचे आदेश जारी… जिल्हाधिकाऱ्यांचं थेट फर्मान; आदेशात काय?

कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिल्याने वाद होतात, त्यामुळे पोलीस बंदोबस्त द्यावा,अशी मागणी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे आता काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दोन जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचे आदेश जारी... जिल्हाधिकाऱ्यांचं थेट फर्मान; आदेशात काय?
petrol and diesel priceImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 22, 2026 | 6:40 PM
Share

Petrol Diesel Shortage : नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता नवीन नियमावली लागू केली आहे. वाहनाव्यतिरिक्त कोणत्याही वस्तूमध्ये पेट्रोल आणि डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. अनेक नागरिक बाटल्या आणि ड्रममध्ये इंधन साठवून नेत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता बाटली आणि ड्रममध्ये पेट्रोल-डिझेल देण्यात येणार नाही. यासोबतच ज्या पेट्रोल पंपांवर इंधन साठा उपलब्ध असूनही ते बंद ठेवले जात आहेत, अशा पंपधारकांची चौकशी केली जाणार आहे.

नंदूरबारमध्ये नेमका काय निर्णय घेण्यात आला

इंधन साठा शिल्लक असताना पेट्रोल पंप बंद ठेवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मित्तली सेठी यांनी दिली आहे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत होत असला तरी नागरिकांकडून अचानक वाढलेल्या मागणीमुळे तुटवड्याची परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक नागरिक इंधनाचा अतिरिक्त साठा करत असल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यात एकूण ९१ पेट्रोल पंप आहेत. मात्र काही पंप बंद राहत असल्याने सुरू असलेल्या पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

दरम्यान, पेट्रोल कंपन्यांसोबत बैठक झाली असून कमी प्रमाणात होणारा पुरवठा लवकरच सुरळीत केला जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवांसाठी इंधन राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये, अन्यथा प्रशासनाकडून कठोर निर्णय घेतले जातील, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. मित्तली सेठी यांनी दिला आहे.

कॅन व बॉटलमध्ये पेट्रोल, डिझेल मिळणार नाही

जळगाव जिल्ह्यात आजपासून पेट्रोल पंपांवर कॅन तसेच बॉटलमध्ये पेट्रोल डिझेल न देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे. पेट्रोल डिझेल कॅनमध्ये दिल्यास पेट्रोल पंप चालकावर कारवाई करण्यात येणार आहे. या आदेशानंतर कॅन व बॉटलमध्ये पेट्रोल, डिझेल मिळणार नाही, असे फलक लावण्यात आले आहेत. कॅन व बॉटलमध्ये पेट्रोल डिझेलसाठी नागरिक आग्रह धरतात, देण्यास नकार दिला की रोष व्यक्त केला जात असल्याची तक्रार पेट्रोल पंपाच्या मालकांनी केला आहे.

लोकांची होणार मोठी अडचण

कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिल्याने वाद होतात, त्यामुळे पोलीस बंदोबस्त द्यावा,अशी मागणी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. कॅनमध्ये मिळणार नसल्याने वाहनांव्यतिरिक्त ज्यांना डिझेल आवश्यक आहे त्यांची मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे मोठी अडचण होत आहे.

Follow Us
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने