AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे पिंपरी चिंचवडला हादरवणाऱ्या मृत्यूकांडांचं खर कारण आलं समोर, योगेश वानखेडेने..

पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे विषारी दारूमुळे झालेल्या ११ मृत्यूंमुळे खळबळ उडाली आहे. दारूत मिथेनॉल मिसळल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी योगेश वानखेडे या मुख्य आरोपीला अटक केली आहे, तर दारू अड्ड्याचा मालक कर्नलसिंह विरखा याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

पुणे पिंपरी चिंचवडला हादरवणाऱ्या मृत्यूकांडांचं खर कारण आलं समोर, योगेश वानखेडेने..
आरोपी योगेश वानखेडे
| Updated on: May 29, 2026 | 10:52 AM
Share

पिंपरी चिंचवड आणि पुणे येथे विषारी दारूकांडामुळे झालेल्या मृत्यूने प्रंचंड खळबळ माजली आहे. गेल्या दोन दिवसात या दोन्ही शहरात एकूण 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील 11 जणांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला, तर चार जणांचा मृत्यू इतर कारणाने झाला . या दारूकांडातील मोठी अपडेट आता समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी योगेश वानखेडेला अटक केली होती. आरोपी योगेश वानखेडे ने दारू मध्ये मिथेनॉल मिळवल्याने ही घटना घडली अशी माहिती समोर आली आहे.

दारू वितरीत करायचा पण मध्येच गाडी थांबवून…

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश वानखेडे हा दारू वितरीत करण्याचं काम करत होता. मात्र दारूचं वितरण करत असतानाच तो मध्येच गाडी थांबवून त्याने दारूत मिथेनॉल मिसळलं होतं, असं समोर आल्याचं पोलिसांनी साांगितलं. याप्रकरणी आम्ही 3 ठिकाणी कारवाई केली असून पुढील तपास करत आहोत असंही पोलिसांनी नमूद केलं. तर  याप्रकरणात अन्य एक आरोपी असून कर्नलसिंह विरखा असं त्याचं नावं आहे. तो दारू गुत्त्याचा मालक असून त्याचा शोध सुरू असल्याचंही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधीक्षक अतुल कानडे यांनी नमूद केलं.

मुख्यमंत्र्यांनी घेतली विषारी दारू प्रकरणाची दखल

दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. या घटनेप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांना दिले आहेत. याप्रकरणी कोणाचीही गय करू नका, कठोर कारवाई करा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विषादी दारूमुळे लोकांचा जीव गेल्याने पुण्यात मोठी खळबळ माजली असून याप्रकरणी दोन्ही पोलिस दलाकडून समन्वयाने तपास सुरू आहे. तसेच संबंधित ठिकाणी छापे मारले असून आत्तापर्यंत 8 लोकांना अटक केल्याची माहिती मिळते. या लोकांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तसेच अबकारी विभाग सुद्धा तपासात सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट