AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरी आले आणि जीव गेला… विषारी दारूकांडाचे 11 बळी, पुणे पिंपरी चिंचवडमधील एकूण मृतांचा आकडा 15 वर, नावे आली समोर

पिंपरी चिंचवड आणि पुणे येथे विषारी दारूकांडात गेल्या दोन दिवसांत 13 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दारू प्यायल्यानंतर तोंडातून फेस येणे, चक्कर येणे अशी गंभीर लक्षणे दिसली. यात तरुण आणि वृद्धांचा समावेश आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

घरी आले आणि जीव गेला... विषारी दारूकांडाचे 11 बळी, पुणे पिंपरी चिंचवडमधील एकूण मृतांचा आकडा 15 वर, नावे आली समोर
विषारी दारूकांडाने पुणे-पिंपरी चिंचवड हादरलं
| Updated on: May 29, 2026 | 10:24 AM
Share

गेल्या दोन दिवसापासून पिंपरी चिंचवड आणि पुणे हादरून गेले आहे. गेल्या दोन दिवसात या दोन्ही शहरात एकूण 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील 11 जणांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला आहे, तर चार जणांचा मृत्यू इतर कारणाने झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दारू पिऊन घरी आल्यावर काही वेळाने तोंडातून फेस आला, कुणाला चक्कर आल्याने बाथरूममध्ये पडले तर कुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. या दारूकांडप्रकरणी आतापर्यंत एकाला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुणे पोलीस उपायुक्तांनी या मृत्यू कांडाची माहिती दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कालपासून एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दारू पिऊन मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 11 आहे. यात पिंपरीतील 6 आणि हडपसरच्या 5 जणांचा समावेश आहे. बाकी इतर मृत्यू हे वेगवेगळ्या कारणाने झाले आहेत. यात नैसर्गिकरित्या मृत्यू झालेल्यांचाही समावेश आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तसेच या मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाने विषारी दारू मृत्यू प्रकरणी योगेश वानखेडे याला अटक केली. तो स्वतः पोलिसांसमोर हजर झाला , अखेर त्याला अटक करून चौकशी सुरू करण्यात आली.

फुगेवाडीत 8 जणांचा मृत्यू

पुणे-मुंबई महामार्गावरील फुगेवाडी भागात एकाच दिवशी 8 जणांच्या मृत्यूने खळबळ माजली. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू हा विषारी दारूमुळे झाल्याचे समोर आले. समोर आलेल्या माहितीनुसार, अटकेतील आरोपी योगेश वानखेडेच पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी आणि पुण्याच्या हडपसर भागात केमिकलयुक्त स्पिरिट पोहोचवलं होतं. या स्पिरिटपासून बनवलेली घातक हातभट्टीची दारू प्यायल्याने पिंपरीत 6 जणांना जीव गमवावा लागला आहे

हडपसरमध्येही मृत्यू

तर याच विषारी दारूमुळे हजपसर मधील 5 नागरिकांनाही प्राणास मुकावं लागलं. त्यांच्यापैकी अनेक लोकांना गावठी दारू प्यायल्यावर उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होत होता, अशी माहिती समोर आली होती. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं खरं, पण तोपर्यंत उशीर झाला. उपचारांदरम्यान 5 जणांनी जीव गमवला. पुणे व पिंपरी येथे एकूण 11 जणांचा दारूमुळे मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली असून लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलिस याप्रकरणी सखोल तपास करत असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

मृतांची नावं समोर आली आहेत.

हडपसरमधील मृतांची नावे

– राहुल शरद क्षीरसागर (वय 45 वर्षे) रा. हडपसर पुणे

– विजय भू कुरलाल शर्मा (वय 45 वर्षे) रा. हडपसर पुणे

– अरुण डाडर – हडपसर

– अशोक रमेश चव्हाण , रा. काळेपडळ

फुगेवाडी, पिंपरी चिंचवडमधील मृतांची नावे

– पाडुरंग फुगे

– विजय प्रकाश राठोड

– राजेंद्र प्रकाश राठोड

– राजू रजपुत

– अकबर पठाण

– बाबा शेख

– आनंद देसाई

– आनंद निकाळजे

दोघांची प्रकृती चिंताजनक

१) सुभाष डिगीकर – मेडी पॉईंट हॉस्पिटल

२) अक्षय अवसरमल – यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल

 

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट