AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींचा फोटो हटवल्याने 2 मनसे कार्यकर्त्यांना अटक, अमित ठाकरेंना अटक झाल्यास…मनसेचा थेट इशारा!

मिळालेल्या माहितीनुसार मोदींचा फोटो हटवल्यानंतर यासंदर्भात अमित ठाकरे यांच्यासह एकूण 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्री उशीरा यातील दोघांना अटक करण्यात आली होती.

मोदींचा फोटो हटवल्याने 2 मनसे कार्यकर्त्यांना अटक, अमित ठाकरेंना अटक झाल्यास...मनसेचा थेट इशारा!
amit thackeray and narendra modi photoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 01, 2026 | 4:47 PM
Share

MNS Amit Thackeray : मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाजूला मोदी यांचा फोटो चालणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. अमित ठाकरे आणि इतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोदींचा फोटो हटवल्यानंतर आता चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. अमित ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी भाजपाचे नवनाथ बन यांनी केली होती. दरम्यान, आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. या अटकेनंतर आता मनसेचे आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

पुण्यात नेमकं काय घडलं?

अमित ठाकरे 31 ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान त्यांनी शासकीय तंत्रिनिकेतन महाविद्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी वसतीगृह अधिकक्षकांच्या कार्यालयात जाऊन अधिक्षलाला विद्यार्थ्यांच्या सोईसुविधांबाबत जाब विचारला. यावेळी त्यांनी मोदींचा फोटोही हटवण्यास सांगितले. मनसेच्याच एका कार्यकर्त्याने नंतर मोदींचा फोटोही काढून टाकला. त्यानंतर भाजपाने या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला. मोदी यांचा फोटो हा प्रोटोकॉलप्रमाणेच लावण्यात आला होता, असं नवनाथ बन म्हणाले होते. आता याच संदर्भात पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली?

मिळालेल्या माहितीनुसार मोदींचा फोटो हटवल्यानंतर यासंदर्भात अमित ठाकरे यांच्यासह एकूण 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्री उशीरा यातील दोघांना अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर मनसे कार्यकर्ते चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना भेटण्यासाठी गेले होते. तसेच अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर अटकेची कारवाई केलीतर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली. रात्री उशिरा मनसेच्या दोन कार्यकर्त्यांना अटक करणे ही चुकीची बाब आहे, अशी भूमिकाही मनसेने घेतली आहे. कॉलेजमधील सहा विद्यार्थ्यांवर देखील गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला तर मनसे गप्प बसणार नाही, असा इसारा मनसेने दिलाय. त्यामुळे आता नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल