AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील टोळी युद्ध थांबेना, बालाजीनगर गोळीबाराबद्दल पोलिसांची मोठी माहिती, वनराज आंदेकरच्या..

पुण्यात पुन्हा एकदा टोळी युद्ध तोंडवर काढताना दिसत आहे. आज दिवसाढवळ्या बालाजीनगर येथे मोठी गोळीबाराची घटना घडली. या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा हल्ला आंदेकर टोळीकडून करण्यात आल्याचे सांगितले जातंय.

पुण्यातील टोळी युद्ध थांबेना, बालाजीनगर गोळीबाराबद्दल पोलिसांची मोठी माहिती, वनराज आंदेकरच्या..
Pune Crime
| Updated on: May 20, 2026 | 1:44 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर पुण्यातील टोळी युद्ध प्रचंड चर्चेत आहे. या टोळी युद्धामुळे पुण्यात भितीचे वातावरण आहे. 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज आंदेकर यांची भर चाैकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. फक्त गोळ्याच नाही तर गोळ्या झाडल्यानंतर पुन्हा कोयत्याने त्यांच्यावर असंख्य वार करण्यात आली. या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली. पुण्यातील नाना पेठ येथील डोके तालमी समोर वनराज आंदेकर उभे असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. तेव्हापासून हे टोळी युद्ध सुरू आहे. आंदेकर टोळी या हत्येचा बदला घेण्याकरिता प्रयत्न करत आहे. आता नुकताच पुण्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली. भर चाैकात पुन्हा एकदा टोळी युद्धातून सकाळी हल्ला झाला. वनराज आंदेकर याच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी एका आरोपीच्या भावावर आज सकाळी हल्ला करण्यात आला.

भर रस्त्यावर ही घटना घडली. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आता याबाबत मोठी माहिती पुढे येत आहे. पोलीस राजेश बनसोडे यांनी या हल्ल्याबाबत माहिती देताना सांगितले की, तीन ते चार लोकांनी कोयता आणि गोळीबार केला. अक्षय हा रिक्षाचालक आहे. अक्षय बाळू यांच्यावर चार राऊंड फायर करण्यात आले आहे.

सर्व पोलिस अधिकारी आरोपीचा शोध घेत आहोत. आंदेकर टोळीशी याचा संबंध आहे का याचा शोध सुरु आहे. लवकरच आरोपी जेरबंद करणार असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. आंदेकर टोळीच्या अॅंगलने पोलिस तपास करत आहेत. भरदिवसा गोळीबार झाल्याने बालाजीनगरमध्ये भीतीचे वातावरण आहे. 2024 मध्ये वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर 2025 मध्ये एक वर्ष पूर्ण होताच आंदोकर टोळीने बदल म्हणून नातवालाच संपवले.

5 सप्टेंबर 2025 रोजी नाना पेठेत वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची टोळीने हत्या केली. बंडू आंदेकरसोबतच कुटुंबातील अनेक सदस्य जेलमध्ये आहेत. महापालिका निवडणुकही जेलमधूनच लढवण्यात आली.

Follow Us
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा