AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मजामस्तीमध्ये पोलीस निरीक्षकाकडूनच पोलीस ठाण्यात गोळीबार, नाशिक हादरलं

नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मजामस्तीमध्ये पोलीस निरीक्षकाकडूनच पोलीस ठाण्यात गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! मजामस्तीमध्ये पोलीस निरीक्षकाकडूनच पोलीस ठाण्यात गोळीबार, नाशिक हादरलं
नाशिकच्या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 28, 2026 | 6:02 PM
Share

नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मजामस्तीमध्ये पोलीस निरीक्षकाकडूनच पोलीस ठाण्यात गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये असलेल्या एका पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे शासकीय पिस्तुलातूनच हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या घटनेसंदर्भात माहिती देण्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून नकार देण्यात आला आहे.  परंतु दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात ट्विट करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे? 

‘खाकीची मग्रुरी आणि मजामस्ती! ​नाशिकमध्ये पोलीस ठाण्यासारख्या संवेदनशील ठिकाणी एका पोलीस निरीक्षकाने केवळ ‘मजामस्ती’ म्हणून शासकीय पिस्तुलातून गोळीबार करावा, म्हणजे मनमौजी कारभाराचा नमुना आहे. सामान्य नागरिकांना सुरक्षेचे धडे देणारेच आता कायद्याची ऐशीतैशी करत आहेत. ​सर्वात संशयास्पद आणि संतापजनक बाब म्हणजे, आठवडा उलटूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साधलेले मौन! यावर नासिक पोलिस आणि गृह विभाग बोलणार का? १. ​CCTV फुटेज गायब करण्याचा आणि ‘डेली डायरी’मध्ये नोंद न करता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे का? २. ​नियम धुडकावून गोळीबार करणाऱ्या आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी ही सुंदोपसुंदी सुरू आहे का? ३. ​स्वतःच्याच माजलेल्या अधिकाऱ्यावर कारवाईचे धाडस दाखवणार की ‘खाकी-खाकी भाई भाई’ म्हणत विषय मिटवणार? ​गृह विभाग आणि सरकारने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी.’  असं ट्विट अंबादास दानवे यांनी केलं आहे.

काय आहे प्रकरण? 

समोर आलेल्या माहितीनुसार नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये असलेल्या एका पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. पोलीस निरीक्षकाने मजामस्तीमध्ये थेट पोलीस ठाण्यातच शासकीय पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना घडल्याचं बोललं जात आहे. मात्र या घटनेसंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट