AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आबांच्या जिल्ह्यातच छम-छम, मिरज येथील डान्सबारवर पोलिसांचा छापा,पाच ग्राहकांना अटक

सांगलीच्या मिरज तालुक्यातील विजयनगरमध्ये एका डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकला आहे. राज्यात डान्सबारवर बंदी घालणाऱ्या स्वर्गीय आर.आर.आबा पाटील यांच्याच जिल्ह्यात डान्सबार सुरु झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आबांच्या जिल्ह्यातच छम-छम, मिरज येथील डान्सबारवर पोलिसांचा छापा,पाच ग्राहकांना अटक
Police Raid Dance Bar in Miraj
| Updated on: May 26, 2026 | 6:15 PM
Share

राज्याचे तत्कालिन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राज्यात डान्सबारवर बंदी आणून एकेकाळी खळबळ उडवून दिली होती. मात्र, स्वर्गीय आर.आर.पाटील उर्फ आबा यांच्याच सांगली जिल्ह्यात पुन्हा डान्सबार सुरु झाल्याचे विदारक चित्र आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील विजयनगर मध्ये सुरू असणाऱ्या डान्सबारवर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली आहे. पहाटेपर्यंत सुरू असणाऱ्या कारवाई मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच महिलावर कारवाई करण्यात आली आहे. तर ग्राहक म्हणून आलेल्या सांगली जिल्ह्यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पाच महिला आणण्यात आले होते. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहिती आधारे स्पेशल पथक स्थापन करुन ‘राही पॅलेस’ वर छापा टाकला. यावेळी या बारमध्ये ग्राहकांसमोर नृत्य करून त्यांचे मनोरंजन करताना पाच महिला आढळल्या. या बारमध्ये डान्स करण्यासाठी आलेल्या महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच डान्स बारमध्ये आलेल्या पाच ग्राहकांनाही अटक झाली आहे. स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये डान्सबारवर बंदी घातली होती. परंतु स्वर्गीय आर.आर.पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातच पुन्हा डान्सबारमध्ये छम-छम सुरू झाली आहे. पहाटेपर्यंत मिरज ग्रामीण पोलिसांची राही पॅलेस या डान्सबारवर कारवाई सुरू होती.

पाच महिलांची सुटका आणि पाच ग्राहकांना अटक

सांगलीच्या मिरज तालुक्यातील विजयनगर येथे राही पॅलेस या बारमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच महिला आणण्यात आले असून या ठिकाणी डान्सबार सुरू असल्याची माहिती मिरज पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने राही पॅलेसवर छापा टाकला. यावेळी बारमध्ये ग्राहकांसमोर नृत्य करताना आणि अश्लील अंगविक्षेप करताना पाच महिला आढळल्या. या छाप्यात बारमध्ये डान्स करण्यासाठी आलेल्या महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच डान्स बारमध्ये आलेल्या पाच ग्राहकांना अटक करण्यात आली असल्याचे मिरजचे ग्रामीण पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी सांगितले.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,